बारामतीच्या डॉक्टरांनी हळद-काळी मिरीच्या मिश्रणापासून बनवले कोरोना वरील औषध….
डॉक्टरांच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल...

बारामतीच्या डॉक्टरांनी हळद-काळी मिरीच्या मिश्रणापासून बनवले कोरोना वरील औषध….
डॉक्टरांच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल…..
बारामती वार्तापत्र
कोरोनाने अखंड जगावरच थैमान घातले आहे मागील वर्षभरापासून कोरोना आजारावर प्रभावी ठरणाऱ्या औषधावर संशोधन केले जात आहे. अशावेळी बारामतीतील डॉक्टरांनी किमया साधत हळद-काळी मिरीच्या मिश्रणापासून कोरोनावर प्रभावी ठरू शकणारे औषध तयार केले आहे.
बारामतीच्या डॉक्टरांनी हळद आणि काळी मिरी यांच्या मिश्रणातून कोरोना आजारावर प्रभावी ठरणारे औषध शोधून काढले आहे.या औषधाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. हळदीमध्ये असणारा ‘करक्युमीन ‘ हा पोषक घटक व काळी मिरी यांच्या मिश्रणातून औषधाची निर्मिती करण्यात आली आहे. या औषधाच्या वापराने कोरोना बाधित रुग्णांवर उपचार होऊ शकतात.तसेच कोरोना आजारामुळे रुग्णाच्या शरीरावर होणारे दुर्गामी परिणाम टाळता येऊ शकतात. असा दावा बारामतीच्या डॉ.किर्ती पवार यांनी केला..
डॉ कीर्ती पवार, डॉ.राहूल मस्तूद व त्यांच्या सहकाऱ्यांनी या संदर्भात केलेले संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता प्राप्त जर्नल फ्रंटियर्स इन फार्माकॉलॉजी यामध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या औषधांबाबत बोलताना कीर्ती पवार म्हणाल्या की, बारामती येथील सार्वजनिक रुग्णालयात इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च यांची मान्यता मिळाल्यानंतर करक्युमीन या औषधाची क्लिनीकल ट्रायल १४० रुग्णांवर घेण्यात आली. यात सौम्य लक्षणे, मध्यम व गंभीर स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांचा समप्रमाणात सहभाग होता.रुग्णालयात दाखल होताना रुग्णांची शरीरात असलेली ऑक्सिजनची पातळी यावरून कोरोनाबाधित रुग्णांची सौम्य, मध्यम व तीव्र लक्षणांमध्ये विभागणी करण्यात आली. अशा रुग्णांच्या एका समुहाला कोव्हीड टास्क फोर्सने निर्देशित केलेली ओषधे देण्यात आली तर दुसऱ्या समुहाला कोव्हीड टास्क फोर्सने निर्देशित औषधांसोबत करक्युमीन ५२५ एमजी व बायोपेरीन अडीच एमजी म्हणजे हळद व काळी मिरी याचे योग्य मिश्रण असलेले हे औषध दिवसातून दोन वेळा देण्यात आले..
डॉ.किर्ती पवार, डॉ. राहूल मस्तूद ,डॉ सतीश पवार, सम्राज्ञी पवार, डॉ. रमेश भोईटे , डॉ. राहुल भोईटे, डॉ. मीनल कुलकर्णी व संख्याशास्त्रज्ञ आदिती देशपांडे या टीमने हे संशोधन केले असून. आंतरराष्ट्रीय जर्नल फ्रंटियर्स इन फार्माकॉलॉजी यामध्ये प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनामुळे भारतासह जगभरातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मदत होणार आहे.शिवाय वैद्यकीय यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.तसेच करक्युमीन व बायोपेरीन याचे मिश्रण असलेली गोळी यु.एस.एफ.डी.ए मान्यताप्राप्त आहे व ती कोणत्याही औषध दुकानात उपलब्ध आहे व कोव्हीड होऊ नये म्हणून रोज एक गोळी घेतल्यास त्याचा प्रतिबंधात्मक उपयोग होऊ शकतो.