बारामतीच्या पवई मळा मध्ये आढळला कोरोनाचा नवा रुग्ण.
आजही कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ.
बारामती:-प्रतिनिधी
कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील ३८ रुग्णांचे स्वब घेण्यात आले त्यामध्ये काल सायंकाळी ३६ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला होता परंतु काल रात्री उशिरा आलेल्या एका अहवालानुसार पवई मळा येथील एका महिलेचा ५५ वर्षीय कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी यांनी दिली.
दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण आत्ता ग्रामीण भागात सापडत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.