बारामतीच्या पवई मळा येथील आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.
सदर महिलेस खासगी दवाखान्यातुन रुई येथील कोविड केअर सेंटर ला केले होते रेफर.
बारामतीच्या पवई मळा येथील आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.
सदर महिलेस खासगी दवाखान्यातुन रुई येथील कोविड केअर सेंटर ला केले होते रेफर.
कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील ३८ रुग्णांचे स्वब घेण्यात आले होते त्यामध्ये काल सायंकाळी ३७ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला होता परंतु काल रात्री उशिरा एका ५५ वर्षीय महिलेचा अहवाला पॉझिटिव्ह आला होता सदर महिला त्रास होत असल्यामुळे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी गेली होती मात्र जास्त त्रास होऊ लागल्याने तीला ग्रामीण रुग्णालय रूई येथे रेफर केले होते परंतु श्वास घेता येत नसल्याने व त्रास वाढल्यामुळे तिचा आज मृत्यू झाला असल्याची अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण आत्ता ग्रामीण भागात सापडत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.