स्थानिक

बारामतीच्या पुरवठा विभागात भोंगळ कारभार.

सर्वसामान्य नागरीकांची होतेय आर्थिक लूटमार :: अधिकारी करतात जाणीवपूर्वक डोळेझाक.

बारामतीच्या पुरवठा विभागात भोंगळ कारभार.

सर्वसामान्य नागरीकांची होतेय आर्थिक लूटमार :: अधिकारी करतात जाणीवपूर्वक डोळेझाक.

बारामती वार्तापत्र

बारामतीच्या तहसिल विभागात अनोगोंदी कारभार दिसून येत असून याठीकाणी अनधिकृतपणे काही लोक महसूल कर्मचारी असल्याचा वाव आणत जनसामान्य लोकांची विविध कामासाठी अर्थिक लूटमार करत असल्याचे समोर आले आहे. सरकारी टेबलवर बसणाऱ्या खासगी व्यक्तींना त्याच विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याची चर्चा रंगू लागली असून त्याच्या वरकमाईत आर्थिक समभाग असल्याचे समजत आहे. या सर्व प्रकारची चौकशी करण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत.

तर काही सामान्य व्यक्ती रेशनकार्ड संदर्भात पुरवठा विभागात गेल्यास अपुऱ्या कागदपत्रामुळे अधिकारी वर्गाकडुन माघारी पाठविण्यात येते. यावेळी मात्र तेथील टेबल वर काम करणारे खासगी लोक अधिकाऱ्यांची नजर चुकवून या लोकांचा पाठलाग करून माझ्याकडे एवढे पैसे व कागदपत्रे दया मि तुमचे काम करून देतो असे सांगण्यात येते. यामुळे पुरवठा विभागात अपुरी कागदपत्रे असले तरी देखील पैशांच्या जोरावर कामे करून दिली जात आहेत.याचा असंख्य नागरिकांना रेशनकार्ड साठी आर्थिक लूटमार होत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आलेल्या नागरिकांनी माहिती दिली. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुरवठा विभागाची तात्काळ चौकशी करून अशा खासगी कर्मचाऱ्यांना वेसण घालण्याची नितांत गरज भासू लागली आहे.

प्रशासकीय भवनातील पुरवठा विभागात रेशनकार्डच्या विविध कामांसाठी हजारो रुपये उकळले जात असल्याच्या अनेक तक्रारी सर्वसामान्य नागरिक करू लागले आहेत. तर पुरवठा विभागात शासकीय नेमणूक नसताना देखील खासगी व्यक्तीला अनधिकृतपणे टेबलवर काम करण्यासाठी परवानगी दिली जात असल्याचे समोर आले आहे. पुरवठा विभागात सर्वसामान्य नागरिकांची लुटमार केली जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. तर पुरवठा विभागात किरकोळ कामकाजासह रेशनकार्ड काढण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात असे सांगून सर्वसामान्य लोकांकडून हजारो रुपये घेतले जातात. यामुळे बारामतीच्या प्रशासकीय भवनात सध्या भोंगळ कारभार सुरु असल्याचे समोर आले आहे. पुरवठा विभागात सर्वसामान्य व्यक्ती तालुक्याच्या काना कोपऱ्यातून रेशनिंगचे विभक्त,दुबार,नाव कमी करणे,नाव वाढविणे यासाठी कामे घेऊन येत असतात. मात्र,कमी खर्चात होणाऱ्या कामांसाठी हजारो रुपये लुटले जातात, यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे. तर जे पैसे देतील त्या नागरिकांना तातडीने रेशन कार्डाची कामे करून दिली जातात,तर पैसे न देणाऱ्या नागरिकांना जाणीवपूर्वक खेटे घालण्यासाठी भाग पाडले जात आहे. यामुळे आता सर्वसामन्य जनतेची हेळसांड व लुटमार करणाऱ्यांना जरब बसण्यासाठी अधिकारी याबाबत काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!