बारामतीच्या महिला अधिकाऱ्याची कमाल 1 कोटीच्या वीज बिलांची केली वसुली
ऑक्टोबर 2019 पासून यादव मॅडम यांनी वेळोवेळी फिल्ड वर उतरून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत .

बारामतीच्या महिला अधिकाऱ्याची कमाल 1 कोटीच्या वीज बिलांची केली वसुली
ऑक्टोबर 2019 पासून यादव मॅडम यांनी वेळोवेळी फिल्ड वर उतरून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत
बारामती वार्तापत्र
बारामतीत महावितरण च्या बारामती ग्रामीण शाखा क्र 2 मधील कनिष्ठ अभियंता कु .अरुंधती यादव मॅडम यांनी पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर काकणभर जास्तच कामगिरी करून दाखवली आहे .
सध्या बारामती ग्रामीण शाखा क्र 2 मध्ये कार्यरत असणाऱ्या महिला अधिकारी अरुंधती यादव मॅडम या मूळच्या सांगली जिल्ह्यातील आहेत . 2019 मध्ये त्या महावितरण मध्ये रुजू झाल्या .. बऱ्यापैकी पुरुष वर्ग असणाऱ्या महावितरण मध्ये हातावर मोजता येतील एवढ्या महिला अधिकारी आहेत .
आणि त्यातही बऱ्यापैकी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या आहेत . परंतु यादव मॅडम यांनी बारामती ग्रामीण शाखेचा चार्ज घेतला . बारामती शाखा क्र .2 मध्ये गुणवडी , बांदलवाडी , डोर्लेवाडी , झारगडवाडी , सोनगाव , मेखळी या गावांचा समावेश होतो .
ऑक्टोबर 2019 पासून यादव मॅडम यांनी वेळोवेळी फिल्ड वर उतरून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत . त्यामुळं यादव मॅडम यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या समस्या नक्की काय आहेत या पूर्ण माहिती झाली .
डिसेंबर 2020 मध्ये शासनाच्या कृषी बिल धोरण 2020 चालू झाल्यानंतर यादव मॅडम यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात तिथल्या विद्युत कर्मचाऱ्यां बरोबर जाऊन गावातल्या शेतकऱ्यांना कृषी वीज बिल धोरण समजावून सांगितलं . शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेतल्या , या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून आज रोजी बारामती ग्रामीण शाखा नं 2 चा वीज बिल वसुलीचा 1 कोटी चा टप्पा पूर्ण झाला . लवकरात लवकर 2 कोटींचा टप्पा ही यादव मॅडम आणि त्यांची टीम पूर्ण करील ही अपेक्षा .
या कामी त्यांना बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री सुनील पावडे साहेब , बारामती मंडल चे अधीक्षक अभियंता श्री चंद्रकांत पाटील साहेब , बारामती विभाग चे कार्यकारी अभियंता श्री गणेश लटपटे साहेब व बारामती ग्रामीण उपविभाग चे उपकार्यकारी अभियंता श्री धनंजय गावडे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले .
बारामती ग्रामीण शाखा क्र 2 मध्ये कृषी योजना 2020 योग्य रित्या राबवण्यात या शाखेची टीम अमोल सपकाळ दादा बुरुंगले , किशोर मस्तूद , नामदेव व्हनमाने , कोकरे , लकडे , निलेश बुरुंगले व निलेश लोणकर यांचा खूप मोलाचा वाटा आहे !!!