स्थानिक

बारामतीच्या माजी नगराध्यक्षांच्या आई वडीलांचा एकाच दिवशी मृत्यु !

एकाच दिवशी आई वडीलांच्या मृत्यूने बोबडे कुटुंबियांवर प्रचंड आघात झाला.

बारामतीच्या माजी नगराध्यक्षांच्या आई वडीलांचा एकाच दिवशी मृत्यु !

एकाच दिवशी आई वडीलांच्या मृत्यूने बोबडे कुटुंबियांवर प्रचंड आघात झाला.

बारामती वार्तापत्र

कोरोना महासाथीमुळे घरेच्या घरे उद्धवस्त झाल्याचे चित्र आहे. एकाच कुटूंबातील अनेक व्यक्तींचा घास कोरोना महामारीने घेतला आहे. बारामतीच्या माजी नगराध्यक्षा संध्या बोबडे यांच्यावर देखील असाच दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बोबडे यांचे आई-वडील एकाच दिवशी कोरोनाने हिरावून नेले आहेत.

बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या एका सोशल मीडिया ग्रुपवर बारामतीच्या माजी नगराध्यक्षा एडवोकेट संध्या बोबडे यांनी एक संदेश पोस्ट केला आणि त्यानंतर त्यांच्या वडिलांची प्रकृती बरी व्हावी म्हणून सार्‍यांनी प्रार्थना केली.

एकाच घरातील एकाहून अधिक जणांना कोरोनामुळे जग सोडण्याची वेळ आली, असे चित्र कोरोना च्या दुसऱ्या लाटेत अधिक प्रकर्षाने पाहायला मिळू लागले आहे. बारामतीचे माजी नगराध्यक्षा ॲडव्होकेट संध्या बोबडे त्यांनी दोन दिवसापूर्वी हा मेसेज दिला होता, त्यावेळी त्यांच्या वडिलांची शांताराम शिंदे यांची प्रकृती उपचारादरम्यान खालावली होती. माझ्या वडिलांची प्रकृती गंभीर आहे, असा संदेश देणाऱ्या एडवोकेट बोबडे या अत्यंत दुःखी झाल्या होत्या. हे त्यातूनच त्यांच्या महिला सहकार्‍यांच्या लक्षात आले होते.

संध्या बोबडे यांचे व़डील शांताराम शिंदे (वय ८९ ) व आई पुष्पावती शिंदे (वय ८०) यांचे अगदी काही तासांच्या अंतराने निधन झाले.

दोन आठवड्यांपूर्वी पुण्यातून थोड अंग दुखतय म्हणून विश्रांती साठी संध्या बोबडे यांच्याकडे ते आले होते. दवाखान्यात नेल्यानंतर दोघांच्याही तपासण्या करुन घेण्याचे डॉ. सतीश बोबडे यांनी ठरविले.

ते कोरोना पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरु झाले.
बारामतीतीलच एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. काही काळ त्यांनी उपचाराला साथही दिली. परंतू रविवारी मात्र प्रारंभी शांताराम शिंदे यांची प्रकृती खालावली व त्यांची प्राणज्योत मालविली. काही तासातच पुष्पावती यांनीही आपला प्राण सोडला. मात्र, पतीचे निधन झाल्याचे पुष्पावती यांना कोणीही सांगितलेले नव्हते, त्यांची तब्येत थोडी चिंताजनक असल्याचेच त्यांना सांगितले गेले. मात्र आयुष्यभर साथ सोबत केलेल्या पुष्पावतीही आपल्या पतीसोबतच कायमच्या निघून गेल्या. शांताराम शिंदे मातीपरिक्षण अधिकारी होते, नोकरीच्या निमित्ताने राज्यातील विविध शहरात त्यांनी काम केलेले होते. बारामतीच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा संध्या बोबडे या त्यांच्या कन्या. एकाच दिवशी आई वडीलांच्या मृत्यूने बोबडे कुटुंबियांवर प्रचंड आघात झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!