बारामतीच्या लता करे यांना सोनू कक्कर यांच्याडून १ लाख २१ हजार रुपयांची आर्थिक मदत
"जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जित है" हे गाणे गात खुश केले.

बारामतीच्या लता करे यांना सोनू कक्कर यांच्याडून १ लाख २१ हजार रुपयांची आर्थिक मदत
“जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जित है” हे गाणे गात खुश केले.
बारामती वार्तापत्र
बारामती येथील मॅरेथॉनपटु लता करे यांनी नुकतीच इंडीयन आयडॉल च्या मंचावर हजेरी लावली. यावेळी लता करे यांची व्यथा ऐकून भारावून जात प्रसिद्ध गायिका सोनू कक्कर यांनी करे यांना एक लाख एकवीस हजार रूपयांची आर्थिक मदत केली.
बारामती येथील लता करे 2013 मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत धावल्या होत्या. लता करे यांनी पहिल्यांदा पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावत प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. बारामतीमधील रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरु असताना त्यांच्या पतीचे नुकतेच निधन झाले. पतीच्या उपचारासाठी वयाच्या ६४ व्या वर्षी धावणाऱ्या लता करे यांनी मिळविलेल्या विजयानंतर सर्वत्र त्यांचे मोठे कौतुक झाले.
त्यानंतर सलग तीन वर्ष त्यांनी वयाची तमा न बाळगता बारामती येथील आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित हॅट्रीक साधली. पतीसाठी अनवाणी धावत स्पर्धा जिंकणाऱ्या करे यांची आयुष्याच्या सत्तरीकडे वाटचाल करणाऱ्या वयातील जिद्द आणि यश पाहुन त्यांच्या जीवनावर चित्रपट देखील काढण्यात आला आहे. लता भगवान करे,एक संघर्षकथा’ असे या चित्रपटाचे नाव आहे.
इंडीयन आयडॉल हा गाण्याच्या रिॲलिटी शोमध्ये देशभरातून स्पर्धक सहभागी झाले असून या मध्ये गायिका सोनू कक्कर, हिमेश रेशमिया,अनु मलिक जज्ज म्हणून काम पाहत आहे; तर आदित्य नारायण कार्यक्रमाचे होस्ट म्हणून काम पाहत आहेत.
नुकत्याच झालेल्या सिनियर सिटिझन एपिसोड मध्ये लता करे या शोमध्ये स्पर्धक असलेल्या पवनदीप राजन या स्पर्धकाला सपोर्ट करण्यासाठी सहभागी झाल्या होत्या. यावेळी करे यांची जीवनाची व्यथा ऐकून गायिका सोनू कक्कर यांनी तत्काळ आर्थिक मदतीचा धनादेश करे यांना सुपूर्द केला. यावेळी उपस्थित सर्वच भारावून गेले होते. तर करे यांनी केलेल्या फर्माईशवर गायक पवनदीप राजन याने “जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जित है” हे गाणे गात खुश केले. त्यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.