बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलसाठी.हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी मशीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द
‘रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे फाऊंडेशन’च्यावतीने
बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलसाठी.हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी मशीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द
‘रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे फाऊंडेशन’च्यावतीने
पुणे;बारामती वार्तापत्र
‘कोराना’ संकटाशी सामना करण्यासाठी येथील रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे फाऊंडेशनच्यावतीने बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलसाठी हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी मशीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
येथील पुणे विधानभवन परिसातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे फाऊंडेशनचे अभिजीत श्याम पन्हाळे यांनी हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी मशीन सुपूर्द केले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, फाऊंडेशच्या संगिता पन्हाळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे फाऊंडेशनचे अभिजीत पन्हाळे म्हणाले, “आमचे आजोबा रावसाहेब शंकर पन्हाळे यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत असतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘कोरोना’ काळात सामाजिक संघटनांना सामाजिक बांधिलकी राखत गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले होते, त्यानुसार आम्ही या कालावधीत विविध उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांतर्गत ही हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी मशीन आम्ही बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाला देत आहोत. ‘कोराना’च्या संकटाशी सामना करताना अनेक रुग्णांना व्हेंटीलेटरची आवश्यकता लागत आहे. व्हेंटीलेटरला पर्याय म्हणून ही हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी मशीन काम करते. या मशीनचा उपयोग ‘कोरोना’ बाधीत रुग्णांना होणार आहे. या ‘कोरोना’ कालावधीत फाऊंडेशनच्यावतीने मास्क, सॅनिटायझर, धान्याचे वाटप करण्यात आले आहेत. तसेच पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटललाही ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन फाउंडेशनच्यावतीने देण्यात आली आहे.”
*****