स्थानिक

बारामतीतला रेमडेसिवीर चा काळाबाजार अंगाशी आला, डाॅक्टरला अटक.

बारामती तालुका पोलिसांच्या तपासात झाले उघड...

बारामतीतला रेमडेसिवीर चा काळाबाजार अंगाशी आला, डाॅक्टरला अटक.

बारामती तालुका पोलिसांच्या तपासात झाले उघड…

बारामती वार्तापत्र

बारामती- बनावट रेमडेसीवीर बनवणाऱ्या टोळीला नुकतीच बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात  इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील एका डॉक्टरचा समावेश असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.स्वप्निल अंकुश नरुटे (वय २९, रा. काझड, ता. इंदापूर) असे या डॉक्टरचे नाव असून त्यास अटक करण्यात आली आहे.

सदर डॉक्टर या टोळीकडून इंजेक्शन घेत ती विकण्याच्या बदल्यात तीन हजार रुपयांचे कमिशन घेत होता. कमिशन पोटी त्याने घेतलेली रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. गत महिन्यात बारामती तालुका पोलिसांनी बनावट रेमडेसीवीर इंजेक्शन तयार करत ती विकणारी टोळी जेरबंद केली होती. या प्रकरणात काटेवाडीजवळील मासाळवाडी येथील दिलीप ज्ञानदेव गायकवाड याच्यासह प्रशांत घरत (रा. भवानीनगर), शंकर दादा भिसे (रा. काटेवाडी, ता. बारामती), संदीप संजय गायकवाड (रा. कसबा, बारामती), दयानंद उद्धव गोसावी व  कृष्णा शशीराव जेवाडे (रा. जवाहरनगर, इंदापूर रोड, बारामती) यांच्यासह डाॅ. स्वप्निल नरुटे व एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

कोरोना संकट काळात रेमडेसीवीरची मोठ्या प्रमाणात मागणी असताना पुरवठा मात्र नगण्य होत होता. याचा गैरफायदा घेऊन या टोळीने पॅरासिटोमाॅल गोळ्यांचे पाणी तयार करत ते कुपीत भरून विकण्याचा धंदा सुरु केला होता. 30 ते 35 हजार रुपयांना एक इंजेक्शन विकले जात होते. या बनावट इंजेक्शनमुळे पवारवाडी (ता. फलटण) येथील स्वप्निल जाधव या कोरोनाबाधिताला आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे या टोळीविरोधात यापूर्वी सदोष मनुष्यवधासह अन्य कलमांनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या रॅकेटमध्ये डाॅक्टरचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!