स्थानिक

बारामतीतील अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी ही सूचना केली. महानिरिक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लोहिया यांची ही पहिलीच बारामती भेट होती.

बारामतीचा आकडा पुन्हा वेगाने वाढू लागला आहे, असे काय झाले की बारामतीचा आलेख एकदमच घसरला, असा सवाल डॉ. लोहिया यांनी या वेळी केला.

बारामतीतील अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी ही सूचना केली. महानिरिक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लोहिया यांची ही पहिलीच बारामती भेट होती.

बारामतीचा आकडा पुन्हा वेगाने वाढू लागला आहे, असे काय झाले की बारामतीचा आलेख एकदमच घसरला, असा सवाल डॉ. लोहिया यांनी या वेळी केला.

बारामती वार्तापत्र

बारामतीतील अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी ही सूचना केली. महानिरिक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लोहिया यांची ही पहिलीच बारामती भेट होती

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत प्रशासनाने गर्दी होऊ नये याची काळजी घ्यावी, असे निर्देश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. मनोजकुमार लोहिया यांनी दिले. बुधवारी (ता.९) त्यांनी अचानक बारामतीला भेट दिली.

बारामतीतील अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी ही सूचना केली. महानिरिक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लोहिया यांची ही पहिलीच बारामती भेट होती. अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, मुख्याधिकारी किरणराज यादव, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, डॉ. सदानंद काळे, डॉ. सुनील दराडे, पोलिस निरिक्षक अण्णासाहेब घोलप, औदुंबर पाटील आदी या बैठकीस उपस्थित होते.

डॉ. लोहिया म्हणाले, लग्नसमारंभाला परवानगी देताना 50 पेक्षा अधिक लोक जमणार नाहीत, त्या प्रत्येक लग्नाचे व्हिडीओ चित्रिकरण असणे, लोकांची यादी इतर सर्व बाबींचे काटेकोर पालन होते की नाही याची काळजी घ्यावी. ज्या रुग्णांची कोरोनाची तपासणी होईल व ज्यांचे अहवाल निगेटीव्ह येतील त्यांनाही सात दिवस गृह विलगीकरणात ठेवावे, तशा प्रकारचे शिक्केच त्यांच्या हातावर मारायला हवेत.

कोरोनाच्या लढाईत पोलिसांची सहभाग वाढायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त करुन ते म्हणाले, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह प्रबोधनही करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. सातारामध्ये पोलिसांनी ज्या पध्दतीने कोविड केअर सेंटर उभारले आहे तसेच बारामती आणि इंदापूरमध्ये करण्याबाबत चाचपणी करण्याच्या सूचना लोहिया यांनी नारायण शिरगावकर यांना केल्या.

बारामतीत असे काय घडले...
बारामती पॅटर्नचे अनुकरण करत आम्ही नांदेडमध्ये कोरोनाची तीव्रता कमी करण्यात यश मिळवले. एकीकडे आमचा आकडा कमी झाला, तर बारामतीचा आकडा पुन्हा वेगाने वाढू लागला आहे, असे काय झाले की बारामतीचा आलेख एकदमच घसरला, असा सवाल डॉ. लोहिया यांनी या वेळी केला.

प्रसंगी कारवाई करा…
ज्येष्ठ नागरिक आणि इतर गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना घराबाहेर पडू देऊ नये, असे नागरिक घराबाहेर पडण्याचा हट्ट करत असतील, तर प्रसंगी कारवाई करा, असे निर्देश महानिरिक्षकांनी या बैठकीत प्रशासनाला दिले. पोलिसांचा यातील सहभाग वाढणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!