बारामतीतील अमराई येथील महिला रुग्णाचा खाजगी प्रयोगशाळेतील कोरोना तपासणीचा अहवाल पाॅझिटिव्ह.
बारामती मध्ये सापडला कोरोना रुग्ण.
बारामतीतील अमराई येथील महिला रुग्णाचा खाजगी प्रयोगशाळेतील कोरोना तपासणीचा अहवाल पाॅझिटिव्ह.
आमराई परिसर मध्ये सापडला रुग्ण
बारमती शहरात दोन महिन्यानंतर कोरोनाचा रुग्ण पुन्हा आढळला आहे. एका 29 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे आज निष्पन्न झाले आहे. शहरातील एका खाजगी लॅबमध्ये संबंधित महिलेची तपासणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आता पुन्हा शासकीय प्रयोगशाळेत तिची तपासणी उद्या केली जाणार आहे
बारामती शहरात तब्बल दोन महिन्यानंतर कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आला आहे.
त्यामुळे बारामतीतील कोरोना रूग्णांची संख्या 23 वर पोहोचली आहे.
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर बारामती शहरात प्रथमच कोरोना रुग्ण आढळला आहे. सदरची व्यक्तीची खाजगी हॉस्पिटलमध्ये स्लॅब घेऊन चाचणी घेतली असता पॉझिटीव्ह आली आहे.
त्यामुळे आमराई परिसरातील सुहासनगर घरकुल जयभिम स्तंभ ते सिध्दार्थनगर चौक ते सचिन काकडे किराणा दुकान ते दामोदरे रॉकेल दुकान ते धनंजय तेलंगे ते वसाहत चौक ते जयभिम स्तंभ सुहासनगर घरकुल चौक ही सीमा गृहीत धरुन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात येत आहे.
तरी सर्व नगर परिषद बारामती येथील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
लॉकडॉऊन शिथिलतेचा गैरफायदा घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, अत्यावश्यक व गरजेच्या कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे व .
दरम्यान, नागरिकांनी शिथील केलेल्या लॉकडाउनचा गैरफायदा न घेता काळजी घ्यावी, मास्क व सॅनेटायझरचा वापर करावा व अत्यावश्यक गरजेच्या कामासाठीच बाहेर पडावे, असे आवाहन दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.