बारामतीतील आजच्या पॉझिटिव रुग्णांची संख्या 17 वर
बारामतीतील एकूण रुग्णांची संख्या 5630
बारामती वार्तापत्र
काल कोरोणाने आपली माघार घेत दिवसभरात 5 रुग्ण अशी संख्या होती . मात्र आज त्यामध्ये वाढ होऊन तालुक्यात एकुण 17 रुग्ण पॉझीटीव सापडले आहेत. अर्थात कालच्या तुलनेत आज जरी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असली तरी तपासण्यांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. कारण काल दिवसभरात एकूण शासकीय rt-pcr चाचण्या 124 झाल्या होत्या. त्यामधून 17 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शहरातील 13 रुग्ण व ग्रामीण भागातील 4 रुग्णांची संख्या आहे.
त्यामुळे आता बारामतीतील एकूण रुग्णांची संख्या 5630 तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5210,, व एकूण मृत्यू 135 आहेत.
तुम्ही काळजी घ्या, घरातून बाहेर कामासाठीच पडा , अनावश्यक गर्दी करू नका ,तुम्ही घरात बसा आणि कोरोणाला हरवा.