बारामतीतील एका युवकाचे अपहरण करून ५ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना केवळ १२ तासात बारामती शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.
तू जर पाच कोटी रुपये एका तासात दिले नाही तर तुझ्या मुलाला मुकशील असे म्हणून फोन बंद केला.

बारामतीतील एका युवकाचे अपहरण करून ५ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना केवळ १२ तासात बारामती शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.
तू जर पाच कोटी रुपये एका तासात दिले नाही तर तुझ्या मुलाला मुकशील असे म्हणून फोन बंद केला.
बारामती वार्तापत्र
बारामतीतील एका युवकाचे अपहरण करून ५ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना केवळ १२ तासात बारामती शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. बारामती तालुक्यातील लिमटेक येथील कृष्णराज उर्फ राज धनाजी जाचक असे अपहरण करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पाच आरोपी निष्पन्न झाले असून, पैकी सुनील लक्ष्मण दडस (वय २६,रा.दुधेबावी ता.फलटण जि. सातारा), गौरव साहेबराव शेटे (वय २०, रा. वायसेवाडीखेड ता. कर्जत जि.नगर) या आरोपींसह कार चालक संतोष शरणाप्पा कुडवे (रा. चंदननगर सर्वे ४९,पुणे) यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पृथ्वीराज ज्ञानदेव चव्हाण (वय २४, रा. संभाजीनगर बारामती) यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती.
कृष्णराज जाचक व पृथ्वीराज चव्हाण हे दोघे बारामती येथील जळोची रोड लगत असणाऱ्या पानसरे ग्रीन सिटी येथे १२ मार्च रोजी रात्री सात ते साडे आठच्या दरम्यान पबजी गेम खेळत होते. दरम्यान तेथे २५ ते ३० वयोगटातील चार अज्ञात व्यक्ती चारचाकी गाडीने आले होते. त्यातील एकाने कृष्णराज यास पकडून काठीने मारहाण करत जबरीने गाडीत बसून पळून नेले. पृथ्वीराज चव्हाण याच्या जवळील मोबाईल व दुचाकी गाडीची चावी जबरीने घेऊन गेले. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास कृष्णराज यांचे वडील धनाजी जाचक यांना कृष्णराजचा फोन आला की, मला काही मुलांनी जळोची गावच्या हद्दीतून मारहाण करून डोळ्याला पट्टी बांधून किडनॅप केले आहे. मला कुठे आणले आहे. माहित नाही परंतु ते पैशांची मागणी करीत आहेत. असे बोलत असताना त्याच्याजवळ असणाऱ्या एकाने फोन हिसकावून घेत धनाजी जाचक यांना म्हणाला की, तुझा मुलगा पाचगणीला शाळेत असताना एका मुलीला त्रास दिल्यामुळे तिने आत्महत्या केली आहे. त्याची सुपारी आम्हाला मिळाली आहे. तू जर पाच कोटी रुपये एका तासात दिले नाही तर तुझ्या मुलाला मुकशील असे म्हणून फोन बंद केला. असे तक्रारीत म्हटले आहे.
बारामती शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार केली. तक्रारदार व अपहरण झालेल्या मुलाच्या वडिलांच्या संपर्कात राहून त्यांना येणाऱ्या मोबाईल फोन नंबर वरून तपास करत बारामती शहर, फलटण, दहिवडी परिसरात तपास करत करत माण तालुक्यातील मोगराळे घाटामध्ये डोंगरदऱ्यातून रात्रीच्या अंधारात जाऊन वरील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. इतर तीन आरोपी फरार असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.