
कोरोना चा सातवा बळी
भिकोबानगर येथील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू.
बारामती वार्तापत्र
बारामतीत रविवारी आढळलेल्या कोरोनाग्रस्ताचा रात्री मृत्यू झाला.
भिकोबानगर येथे रविवारी हा रुग्ण आढळून आला होता. त्यांना उपचारासाठी रुई येथील व कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बारामती तालुक्यातील हा सातवा बळी ठरला आहे.
दरम्यान बारामतीत दररोज आढळणाऱ्या कोरोनाग्रस्तांमुळे बारामतीतील एक खासगी हॉस्पिटल ही शासनाने ताब्यात घेतले असून, बारामतीत खास कोरोनावरील उपचारासाठी पुण्यातील काही मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल्सही येणार असल्याची माहिती मिळत आहे.






