गुणवडी येथील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू .
बारामतीत कोरोना चा आठवा बळी.
बारामती ; वार्तापत
बारामतीत कोरोनामुळे आठवा बळी गेला आहे. आज पहाटे गुणवडी येथील ६४ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या रुग्णाचा तपासणी अहवाल आजच पॉझिटिव्ह आला आहे.
बारामतीत काल ५३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील ५० जणांचे अहवाल मिळाले असून गुणवडी येथील एका ६४ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. परंतु या रुग्णाचा आज पहाटेच मृत्यू झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. तर अद्याप तीनजणांचे अहवाल येणे बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, काल रात्रीच भिकोबानगर येथील रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून बारामतीतील कोरोना बळींची संख्या आठवर पोहोचली आहे.
काल दुपारपर्यंत पाठवलेल्या 53 स्वॅब नमुन्यांपैकी एकूण 50 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 49 अहवाल निगेटिव्ह आले असून गुणवडी येथील 64 वर्षे वयाच्या पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे व तीन अहवाल प्रतीक्षेत आहेत तसेच गुणवडी येथील ज्या रुग्णाचाअहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे त्याचा पहाटे मृत्यू झालेला आहे व उपचार घेत असलेल्या भिकोबा नगर येथील रुग्णाचा रात्री उशिरा मृत्यू झालेला आहे