बारामतीत पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी युवकाचे अपहरण,
पाच कोटी रुपयांची खंडणी एका तासात द्यावी अन्यथा मुलाला मुकाल

बारामतीत पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी युवकाचे अपहरण,
पाच कोटी रुपयांची खंडणी एका तासात द्यावी अन्यथा मुलाला मुकाल
बारामती वार्तापत्र
लिमटेक तालुका बारामती येथील एका 18 वर्ष वयाच्या तरुणाला पाच कोटी रुपयाच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना दि.12 रोजी बारामती येथे घडली.
लिमटेक तालुका बारामती येथील कृष्णराज धनाजी जाचक वय 18 वर्ष यांचे चार अज्ञात आरोपींनी अपहरण केल्याची घटना घडली दिनांक 12 रोजी रात्री सव्वा सात ते साडेसात या दरम्यान जळोची रोड पानसरे ड्रीम सिटी च्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतून पांढऱ्या रंगाच्या टोयोटा कंपनी ची इटिओस गाडी, पिवळ्या रंगाच्या नंबर प्लेट च्या गाडीतून आरोपी आले होते
गाडीतून चार आरोपी 25 ते 30 वर्ष वयोगटातील होते त्यांनी पृथ्वीराज ज्ञानदेव चव्हाण वय 24 विघ्नहर्ता अपार्टमेंट प्लॉट नंबर 403 संभाजीनगर बारामती यांच्या पायावर लाकडी काठीने मारहाण करून कृष्णराज याला जबरदस्तीने गाडीत घालून नेले व त्याच्या जवळील सॅमसंग कंपनीच्या मोबाईल वरून कृष्णराज फोन करेल म्हणून अपहरणकर्त्यांनी कृष्णराज कडून मोबाईल हिसकावून घेतला.तसेच त्याच्या मोटर सायकलची चावी हिसकावून त्याला गाडीत घालून पळवून नेले
दरम्यान या अपहरणानंतर रात्री 09:37 वा. कृष्णराज च्या फोनवरून अपहरण कर्त्या या आरोपींनी त्यांच्या वडिलांच्या फोनवर फोन करून पाच कोटी रुपयांची खंडणी एका तासात द्यावी अन्यथा मुलाला मुकाल अशी धमकी दिली. याची फिर्याद पृथ्वीराज ज्ञानदेव चव्हाण ( वय 24 ) यांनी दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर करीत आहेत