बारामतीतील डॉक्टरांच्या तत्परतेने वाचले रुग्णाचे प्राण
डॉ.आंबर्डेकर आणि डॉ.लोंढेच्या समयसूचकतेचे सर्व स्तरातून कौतुक

बारामतीतील डॉक्टरांच्या तत्परतेने वाचले रुग्णाचे प्राण
डॉ.आंबर्डेकर आणि डॉ.लोंढेच्या समयसूचकतेचे सर्व स्तरातून कौतुक
बारामती वार्तापत्र
बारामतीतील डॉ.केतन आंबर्डेकर आणि डॉ.दिलीप लोंढे यांनी दाखविलेल्या तत्परतेने प्रकृती अतिशय नाजूक असलेल्या रुग्णाचे प्राण वाचल्याने डॉक्टरच देवदूत असल्याचा प्रत्यय रुग्णाच्या नातेवाईकांना आला.
त्याच झालं असं कि,दोन दिवसांपूर्वी छातीत दुखू लागल्याने बारामतीतील एका खाजगी रुग्णालयात सदर रुग्णावर उपचार सुरु होते.उपचारादरम्यानच रुग्णाची प्रकृती नाजूक होत चालली होती.परंतु आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने त्या रुग्णाला पुढील उपचारासाठी मोठ्या खासगी रुग्णालयात घेऊन जाणे कुटुंबियांना शक्य नव्हते.अशा स्थितीत कुटुंबीयांनी बारामतीतील डॉ.अजित आंबर्डेकर यांना संपर्क साधुन रुग्णाविषयी सविस्तर माहिती दिली.डॉ.अजित आंबर्डेकरांनी देखील लागलीच त्यांचे चिरंजीव डॉ.केतन आंबर्डेकर यांना याची माहिती दिली.
यानंतर डॉ.केतन यांनी रुग्णाचे रिपोर्ट बघताच क्षणाचा हि विलंब न करता डॉ.दिलीप लोंढे यांच्याशी संपर्क करत बारामतीतील मोठ्या खासगी रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली.त्यानंतर डॉ.केतन यांनी तातडीने त्या रुग्णालयात जात सदर रुग्णावर यशस्वीरीत्या अँजिओप्लास्टी आणि अँजिओग्राफी करत रुग्णाला मृत्यूच्या दारातून खेचून आणून त्याला जीवदान दिले.दरम्यान डॉ.केतन आंबर्डेकर आणि डॉ.दिलीप लोंढे यांच्या समयसूचकतेचे सर्व स्तरातून कौतुक होते.या सर्व परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय्य सहाय्यक सचिन यादव,सुनिल मुसळे,महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या पुणे जिल्ह्याच्या अधिकारी डॉ.प्रीती लोखंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.