बारामतीतील ‘ त्या ‘ सरपंचाला अजितदादा काय म्हणाले पहा, सरपंचाने केले होती ठेकेदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी
मी बारामतीला निधी देतो तो सामान्य जनतेचा असतो
बारामतीतील ‘ त्या ‘ सरपंचाला अजितदादा काय म्हणाले पहा, सरपंचाने केले होती ठेकेदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी
मी बारामतीला निधी देतो तो सामान्य जनतेचा असतो
बारामती वार्तापत्र
काल अजित दादा दिवसभर आपल्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त होते यादरम्यान बारामती तालुक्यातील एका ठेकेदाराने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना एका फोन कॉल ची क्लिप ऐकून दाखवली आणि दादा कमालीचे संतापले.
बारामती तालुक्यातील एका सरपंचाला एका ठेकेदाराने गावातील रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी फोन केला . मात्र संबंधित सरपंचांनी त्या ठेकेदाराला सांगितले की मी अजित दादांकडे हेलपाटे घालून हे रस्त्याचे काम मंजूर करून आणले आहे. त्यामुळे मला पाच लाख रुपये द्यावे लागतील तरच हे काम सुरू करा अन्यथा काम सुरू करायचे नाही. सरपंच त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे ठेकेदाराने या फोनचे संभाषण थेट उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना ऐकवले. आणि मग दादांचा पारा चढला.
अजितदादांनी भरसभेत या सरपंच महोदया विषयी भाष्य केले आणि म्हणाले मी बारामतीला निधी देतो तो सामान्य जनतेचा असतो या जनतेच्या पैशावर जर कोणी डल्ला मारणार असेल तर त्याला थेट पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल असे सांगीतले.
रस्त्याची कामे किंवा इतर विकासाची कामे हे आपले कर्तव्य समजून करा यापुढे जर कोणी असे ठेकेदारांकडून टक्केवारी ने काही मागितले तर मात्र कितीही जवळचा असला, पवारांच्या बरोबर किती पिढ्या संपर्क असला तरीदेखील त्याची गय करणार नाही असा निर्वाणीचा इशारा समोर उपस्थित असलेल्या सर्व राजकीय पदाधिकारी व सरपंच यांना दिला त्यामुळे दिवसभर या सरपंचा विषयी बारामती तालुक्यात दिवसभर चर्चा सुरू होती