स्थानिक

बारामतीतील दर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या बोलेरो गाडीला भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाकडूनही यासंदर्भातील माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

बारामतीतील दर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या बोलेरो गाडीला भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाकडूनही यासंदर्भातील माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

बारामती वार्तापत्र

बारामतीतील चारधाम यात्रेसाठी निघालेल्या गाडीला दिल्ली नजीकच्या नोएडा मार्गे पुढे जात असताना गुरुवारी (दि. १२) पहाटे बोलेरो जीप आणि हायवा डंपर चा भीषण अपघात होऊन नोएडा नजीक पाच यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू झाला.

यातील चार जण बारामतीतील असून, बारामतीतील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील एक जण अत्यवस्थ आहे.या घटनेची माहिती समजताच बारामतीवर शोककळा पसरली आहे.

आज  गुरुवारी (दि. १२) पहाटे हा अपघात झाला असून या अपघातात बारामतीतील चार जण आणि कर्नाटकातील एका जणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे सर्व यात्रेकरू बोलेरो जीप मधून जात होते, तर आणखी एक महिला व पुरुष यामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यातील एक जण अत्यवस्थ आहे. नोएडातील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बस आणि बोलेरो गाडीतून महाराष्ट्रातील एकूण ५० प्रवाशी निघाले होते. यापैकी बोलेरो गाडीत सात जण प्रवास करीत होेते. काल रात्री वृंदावन या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला. आज पहाटे साडेचार वाजता ते दिल्लीकडे जाण्यासाठी निघाले होते. यावेळी नोएडा नजीक जेवर या गावाजवळ डंपरला बोलेरो गाडीने मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याचे समजते. यात एकूण पाचजणांचा मृत्यु झाला. बारामतीच्या चौघाजणांचा मृत्यु झाला.

तसेच सुनीता राजु गस्ते (बेलगाव,कर्नाटक ) या जखमी झाल्या आहेत. अपघातग्रस्त गाडीचे चाालक नारायण कोळेकर(रा.फलटण) हे गंभीर जखमी आहे. गाडीमधील आणखी दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

नोएडातील महाराष्ट्रीयन पोलीस अधिकारी श्री बोराटे यांनी यासंदर्भात मदत केली असून, त्यांच्याकडून महाराष्ट्रात संपर्क साधला जात आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाकडूनही यासंदर्भातील माहिती घेण्याचे काम सुरू आहे. तसेच मदतही पोहोचवली जात आहे.

बसमधील सर्व प्रवासी सुखरूप या प्रवाशांनी अपघातग्रस्तांना अपघात झाल्यानंतर मदत केली.

या अपघातासंदर्भात तेथील पोलीस अधिकारी श्री बोराटे यांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण (पूर्ण नाव माहीत नाही) हे गंभीर जखमी आहेत. यामध्ये बारामतीतील चंद्रकांत नारायण बोराडे, सुवर्णा चंद्रकांत बोराडे हे दांपत्य, रंजना भरत पवार व मालन विश्वनाथ कुंभार, अशी या चौघाजणांची नावे आहेत. यामध्ये रंजना पवार या उपमुख्यमंत्री यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे खासगी स्वीय सहायक सचिन पवार यांच्या मातोश्री आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram