बारामतीतील दुचाकी चालकाचा अंगावर शहारे आणणारा अपघात
सदर घटनेचा तपास बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे करत आहेत
बारामतीतील दुचाकी चालकाचा अंगावर शहारे आणणारा अपघात
सदर घटनेचा तपास बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे करत आहेत
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात ढवान पाटील चौकात बारा जानेवारी रोजी मोटर सायकल व टँकरचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात दुचाकी चालकाचा जागेवरच मृत्यू झाला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
माळेगांव येथील बाबासाहेब खोमणे हे मोटरसायकलवरून शहरात दूध घालण्यासाठी आले होते. त्यांनी चौकात दुधाच्या टॅंकरला पुढे उजवीकडे वळत होते व टॅंकर डावीकडे वळत होता. यादरम्यान ते उजवीकडे वळाल्यामुळे टँकरच्या चाकाखाली आले व त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
टँकर दूध भरण्यासाठी फलटण कडून बीड कडे निघाला होता अपघात झाल्यानंतर टँकर चालक रामभाऊ सालगुडे हा पोलिस ठाण्यात हजर झाला होता. सदर घटनेचा तपास बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे करत आहेत. या सीसीटीव्ही फुटेज मधील घटना पाहिल्यावर अत्यंत विदारक अशी घटना दिसत आहे.