बारामतीतील देशपांडे विद्यालयात हस्ताक्षर सुधार कार्यशाळा संपन्न
कार्यशाळेसाठी इयत्ता पाचवी ते सातवी इयत्तेचे विद्यार्थी उपस्थित होते.

बारामतीतील देशपांडे विद्यालयात हस्ताक्षर सुधार कार्यशाळा संपन्न
कार्यशाळेसाठी इयत्ता पाचवी ते सातवी इयत्तेचे विद्यार्थी उपस्थित होते.
बारामती वार्तापत्र
बारामतीतील मएसोचे कै. ग.भि.देशपांडे माध्य. विद्यालयात कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स बारामती व मएसो कलावर्धिनी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी “अक्षरलावण्य” या हस्ताक्षर सुधार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक राजाराम गावडे, पर्यवेक्षक शेखर जाधव, दिलिप पाटील, जयश्री शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सुंदर आणि सुबक अक्षर कसे लिहावे याचे मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेत हस्ताक्षरतज्ञ नागराज मलशेट्टी यांनी अक्षरलेखनाची तंत्रे, लेखन वेग आणि स्वच्छता यासंदर्भात माहिती दिली. तसेच, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्णमालेच्या चौदाखडीचा सराव करून घेतला गेला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लिखाणातील स्पष्टता आणि गती सुधारण्यास मदत झाली.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी गायकवाड यांनी या कार्यशाळेचे कौतुक करताना सांगितले की, “सुंदर हस्ताक्षर हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासात अधिक आत्मविश्वास मिळतो.”
या कार्यशाळेसाठी इयत्ता पाचवी ते सातवी इयत्तेचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी संस्थेचे नियामक मंडळ अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे, शाला समिती अध्यक्ष मा. अजय पुरोहित, महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, संस्था समन्वयक मा. पुरुषोत्तम कुलकर्णी , सल्लागार सदस्य मा. राजीवजी देशपांडे आदींचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित पाटील यांनी केले तर आभार भारत काळे यांनी मानले.