इंदापूर शहरात दलित वस्ती योजनेअंतर्गत २ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

इंदापूर शहरात दलित वस्ती योजनेअंतर्गत २ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर शहरातील व तालुक्यातील सर्व सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून कारभार सुरू आहे. त्यामुळे तालुक्याच्या सर्वांगिन विकासासाठी कठिबद्ध असून निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
रविवारी (दि.१६) इंदापूर शहरातील साठेनगर येथे अंतर्गत रस्त्याच्या कामाकरिता दलितवस्ती योजनेतून २ कोटी १० लाख व अंतर्गत बंदिस्त गटर कामाकरिता नगरोत्थान योजनेतून ६७ लाख निधी मंजूर झाल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. यावेळी त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली.
इंदापूर तालुक्यात कोट्यावधी रुपयांची विविध विकासकामे सुरू आहेत. हा विकासरथ सतत पुढे असाच सुरू राहील असा आशावाद यावेळी राज्यमंत्री भरणे यांनी व्यक्त केला.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर आदी उपस्थित होते.