
बारामतीतील फेरेरो इंडिया मध्ये विक्रमी वेतन करार
एकोणीस हजार रुपयांची वाढ
बारामती वार्तापत्र
बारामती एमआयडीसी येथील फेरेरो इंडिया प्रा ली कंपनीत
फेरेरो एम्प्लॉईज युनियन आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये १ जुलै २०२४ ते ३० जुन २०२८ या कालावधीकरिता ४ था ऐतिहासिक वेतन करार संपन्न झाला.
या प्रसंगी कंपनी प्रशासन च्या वतीने वरिष्ठ अधिकारी तोमासो बचिनी ,लारीओ डी फेल्सनी, राजेश बांदेकर ,उमेश दुगाणी ,स्नेहा सावंत नितीन नातू, योगेश मगदूम व युनियन च्या वतीने अध्यक्ष रमेश बाबर,सचिव अमोल पवार, सहसचिव अनंत कुमार जाधव, कार्याध्यक्ष प्रवीण थोरात, उपाध्यक्ष संदीप बिचकुले ,खजिनदार चंद्रकांत नाळे ,सहखजिनदार सचिन पिंगळे ,सदस्य संतोष पवार, सदस्यां भाग्यश्री माने, लक्ष्मी धेंडे, रमोला आवाळे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
करारातील ठळक मुद्दे
एकूण पगारवाढ – १९,००० /–पहिल्या वर्षी ४५ टक्के.-दुसऱ्या वर्षी २३ टक्के.-तिसऱ्या वर्षी २२ टक्के.-चौथ्या वर्षी १० टक्के.मेडिक्लेम पॉलीसी-
पहिले २ वर्ष २,५०,००० /- (अडीज लाख ) नंतरचे २ वर्ष ३,००,०००/-(तीन लाख ) रुपयांची पॉलिसी राहणार असून संपूर्ण खर्च कंपनी करणार.डिलिव्हरी साठी नॉर्मल किंवा सिझर 40 हजार रुपये जिपीएग्रुप एक्सीडेंट पॉलिसी पाच लाख रुपये.- ग्रुप टर्म इन्शुरन्स.- पहिल्या वर्षी २० लाख रुपये- दुसऱ्या वर्षी २२ लाख रुपये.- तिसऱ्या वर्षी २५ लाख रुपये. – चौथ्या वर्षी २५ लाख रूपये.
सुट्ट्यांमध्ये वाढ-प्रत्येक स्टेज नुसार वाढ करण्यात आली
प्यारेलेसिस आजार सुट्ट्या सुद्धा देण्यात येणार असून – कॅन्टीनचे किचन इनहाऊस आणि नाष्टा व जेवणामध्ये न्यूट्रिशन फुडचा समावेश- क्रिकेटचे सामने ऑन पेपरवर घेतले- सोसायटी ऑफिस साठी जागा वाढवून घेण्याचे मान्य करण्यात आले. – जनरल शिफ्ट साठी चहा आणि बिस्किट सुरू करण्यात आले.कामगार फक्त महाराष्ट्राच्या आत मध्येच पाठवला जाईल.
त्याचा कामाचा कालावधी वर्षेच असेल. लॉंग सर्विस अवार्ड.
१० वर्ष १०,०००/- रुपये.
१५ वर्ष १५,५००/- रुपये.
२० वर्ष २१,५००/- रुपये.
रिटायरमेंट बेनिफिट.मध्ये
यामध्ये कर्मचाऱ्यास ५०,०००/- हजार रुपये देण्यात येतील, तसेच कंपनी प्रोडक्ट देण्यात येतील.
दिवाळी बोनस.
२०२४ पहिले वर्ष ४३,०००/- रुपये.
२०२५ दुसरे वर्ष ४६,०००/- रुपये.
२०२६ तिसरे वर्ष ४९,०००/- रुपये.
२०२७ चौथे वर्ष ५२,०००/- रुपये.
एक १ जुलै २०२४ पासून चा पागरचा व इतर फरक फेब्रुवारी २०२५ च्या पगारामध्ये जमा होईल अशी माहिती कंपनी प्रशासन च्या वतीने एच आर मॅनेजर उमेश दुगानी व युनियन च्या वतीने अध्यक्ष रमेश बाबर यांनी दिली करार झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला