बारामतीतील ‘ मटका ‘ चालकांचे कंबरडे मोडणार – पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे
नागरिकांनी तक्रार दिल्यास, नाव गोपनीय राहील
बारामतीतील ‘ मटका ‘ चालकांचे कंबरडे मोडणार – पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे
नागरिकांनी तक्रार दिल्यास, नाव गोपनीय राहील
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात अनेक ठिकाणी अवैध धंदे, ऑनलाइन मटका, मोबाईल वरून चालणारा मटका याविषयी आता बारामती शहर पोलिसांनी कंबर कसली असून मटका एजंट व मालकांचे कंबरडे मोडणार असल्याचे नामदेवराव शिंदे यांनी सांगितले.
बारामतीत अवैद्य सावकारकीच्या प्रश्नावरून पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनची सूत्रे स्वीकारल्यानंतर केलेली अफलातुन कारवाई व त्याला मिळालेले यश आणि यानंतर आता बारामती शहरातील मटक्यावर पोलिसांनी नजर ठेवली आहे.
जे लोक हा व्यवसाय करत असतील मग ते एजंट असो की मालक यांच्याविषयी तक्रार आल्यास त्यांच्याविरोधात कलम 55 चे प्रस्ताव तयार करून त्यांना तडीपार करण्यात येईल. त्यामुळे यापुढे हा व्यवसाय बारामती शहरात चालणार नाही. नागरिकांनी याविषयीची तक्रार दिल्यास त्यांना योग्य बक्षीस शहर पोलिसांच्या वतीने देण्यात येणार आहे. व त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता मटका व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी शहर पोलिसांच्या वतीने आज शहरात एका रिक्षांमधून कारवाईची ऑडिओ क्लिप वाजवत सर्व नागरिकांना सतर्क केले आहे. त्यामुळे आता अवैध सावकारकी पाठोपाठ मटकाकिंग गुडघ्यावर येणार यात मात्र शंका नाही.