बारामतीतील मैदाने खेळाडूंनी गजबजली
लॉक डाऊन मध्ये तरुण मुलांना क्रिकेट ,कबड्डी यांसारखे मैदानी खेळ खेळण्यास मनाई होती
बारामतीतील मैदाने खेळाडूंनी गजबजली
लॉक डाऊन मध्ये तरुण मुलांना क्रिकेट ,कबड्डी यांसारखे मैदानी खेळ खेळण्यास मनाई होती
बारामती वार्तापत्र
मार्च 2019 पासून covid-19 मुळे राज्यात लॉकडाउन केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणांवर कोरोना प्रादुर्भावमुळे बंदी घालण्यात आली होती.सिनेमागृहे ,व्यायामशाळा ,मैदाने यावर बंदी असल्यामुळे मागील नऊ महिन्यापासून सर्व खेळांची मैदाने बंद होती. त्यामुळे खेळाडू नाराज झाले होते. मात्र आता या ग्राउंडवर खेळाडू दिसू लागले आहेत.
लॉक डाऊन मध्ये तरुण मुलांना क्रिकेट ,कबड्डी यांसारखे मैदानी खेळ खेळण्यास मनाई होती. अनेक खेळाडू व्यक्तिगत पातळीवर आपला व्यायाम घरीच करत होते. मात्र आता लॉकडाउन चे नियम शिथिल झाल्यानंतर मैदानामध्ये खेळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.
राज्य शासनाने नुकतीच पोलीस भरतीची प्रक्रिया करण्याचे जाहीर केले त्या अनुषंगाने देखील भरतीपूर्व सराव करण्यासाठी ग्राउंड ची गरज असते. त्यामुळे इच्छुक उमेदवार आता ग्राउंड वरच आपल्या खेळाची तयारी करू लागले आहेत.ज्येष्ठ नागरिकही या मैदानांचा वापर करून आपला दैनंदिन व्यायाम करत आहेत.