स्थानिक

बारामतीतील मोटार वाहन निरीक्षक तुपाशी, तर राज्य शासन उपाशी?

सदर वाहनाची माहिती शासनाच्या परिवहन ऍपवरून घेतली आहे.

बारामतीतील मोटार वाहन निरीक्षक तुपाशी, तर राज्य शासन उपाशी?

सदर वाहनाची माहिती शासनाच्या परिवहन ऍपवरून घेतली आहे.

बारामती वार्तापत्र

बारामती: येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा भोंगळ कारभाराबाबत दिलेल्या वृत्त वाचून नागरीकांमधून बारामतीतील मोटार वाहन निरीक्षक तुपाशी, तर राज्य शासन उपाशी अशा कडव्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.

बारामती येथील मोटार वाहन निरीक्षक स्वत:च्या ताब्यात जी खाजगी वाहने वापरतात ती वाहने फक्त त्यांच्या ताब्यात आहेत मात्र त्या वाहनाचा मालक वेगळाच आहे. मालक वेगळा जरी असला तरी चालेल मात्र, काहींचे वाहनाचे कर थकले आहेत, प्रदुषण प्रमाणपत्र नाही व विमा सुद्धा नाही. कुंपनच शेत खात असेल तर यांना कसे शासनाचे नोकर म्हणायचे हा प्रश्र्न नागरीकांमधून उपस्थित होत आहे. सदर वाहनाची माहिती शासनाच्या परिवहन ऍपवरून घेतली आहे.

काही मोटार वाहन निरीक्षक अधिकृत वाहन विक्रेत्यांच्या शोरूममध्ये वाहने तपासणी करण्यासाठी गेल्यानंतर वाहनातून सुद्धा उतरत नाही.

वाहनात बसून कागदपत्र तपासणी करतात. (याचे छायाचित्र बारामती वार्तापत्राच्या टीमच्या हाती लागलेली आहेत.) वाहन परवाना काढण्यासाठी उपप्रादेशिक कार्यालयात जो ट्रॅक केलेला आहे त्या ट्रॅकवर वाहन परवाना चाचणी देताना संबंधित मोटार वाहन निरीक्षक विनामास्क कागदपत्रे तपासणी करतात.

रस्त्यावर शीरस्त्राण वापरूनच वाहन चालवावे असे सांगितले जाते मात्र, या ट्रॅकवर विनामास्क, विना शीरस्त्राण व पूर्ण शासकीय गणवेशाला तिलांजली देण्याचे काम काही मोटार वाहन निरीक्षक करीत असतात ही खूप खेदाची बाब आहे.

विशेष म्हणजे या ट्रॅकवर फक्त मोटार वाहन निरीक्षक यांना प्रवेश असताना ठराविक शोरूमच्या एजंट लोकांना सूट दिली जाते.
राज्याचे उपमुख्यमंत्री विधानसभेत विनामास्क असणार्‍यांची हजेरी घेतली.

मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या गावात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक विनामास्क वाहने तपासणी करतात, वाहन परवाना चाचणी घेतात ही शोकांतिका आहे.

बारामतीत आज परिवहन राज्यमंत्री असताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गैरहजर असलेबाबत चर्चेला उधान आले आहे. सदरील अधिकारी परिवहन मंत्री किंवा परिवहन आयुक्तांना त्यांच्या आदेशांना जर तिलांजली देत असतील तर हे अधिकारी आहे की, खाजगी कर्मचारी हेच बारामतीकरांना पडलेला खरा प्रश्र्न आहे.

राज्य शासन वेळोवेळी महसुल वसुल करण्यासाठी आदेश देत असताना, हे महाशय फक्त गोर-गरीब व वाहनांवर हातावरचे पोट असणार्‍याच्या वाहनावर दंड ठोकून मी किती मोठी कारवाई केली याबाबत ढोल वाजवीत असतील तर हे चुकीचे आहे.

कित्येक धनदांडग्या लोकांच्या मोठ-मोठ्या वाहनांचे कर, विमा व प्रदुषण चाचणीची मुदत संपलेली असता ती वाहने शाबुत ठेवून इतर वाहनांवर कारवाई करण्यामध्ये हे अधिकारी दंड थोपटीत असतील तर याला काय म्हणायचे.

मोटार वाहन निरीक्षकांना शासकीय गणवेश कशासाठी दिलेला असतो हे ते विसरलेले दिसत आहे.

जी टोपी डोक्यावर घालून मी शासनाचा नोकर असे दर्शवून शासनाचा महसुल गोळा करून जमा करण्याचे काम यांनी करणे गरजेचे असताना हे अधिकारी स्वत:च्या ताब्यात असणार्‍या वाहनांना ही टोपी सर्रासपणे घालताना म्हणजे बोनेटवर ठेवून वाहन अनाधिकृतपणे पार्किंग करण्यासाठी, टोल वाचविण्यासाठी व वाहतुक पोलीसांनी फोटो काढून दंड मारू नये म्हणून याचा वापर होत असेल तर हे शासनाचे कर्मचारी आहेत की, खाजगी याचा उलगडा होणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram