रक्तदान ही एक सामाजिक चळवळ व्हावी :- मधुकर गलांडे (जेष्ठ पत्रकार)
रक्तदान शिबिरात ५१ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.

रक्तदान ही एक सामाजिक चळवळ व्हावी :- मधुकर गलांडे (जेष्ठ पत्रकार)
रक्तदान शिबिरात ५१ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.
इंदापूर/ प्रतिनिधी:- बारामती वार्तापत्र
रक्तदान ही एक सामाजिक चळवळ व्हावी. या रक्तदान सारख्या महायज्ञात युवकांनी सहभागी होऊन ही चळवळ पुढे न्यावी. असे अवाहन मुंबई वृत्तवाहिनी संघाचे प्रदेश उपाध्यक्ष आणी जेष्ट पत्रकार मधुकर गलांडे यांनी केले. ते आज इंदापूर येथे इंदापूर सायकल क्लब, पत्रकार संघ आणि मुक्ताई ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक रक्तदान दिनानिमित्त घेतलेल्या रक्तदान कार्यक्रमाचे उदगाटन प्रसंगी बोलत होते.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक उपक्रमांवर बंधने असली, तरी आपत्ती काळातील गरज ओळखून इंदापूर सायकल क्लब व मुंबई वृत्तपत्र वृत्तवाहिनी संघ यांच्या माध्यमातून रक्तदानाचा स्तुत्य उपक्रम नुकताच राबविला आहे.
या वेळी बोलताना ते असेही म्हणाले की रक्तदान हे एक महत्त्वाचे सामाजीक काम असून आपल्यापासून इतरांचे प्राण रक्तादान केल्याने वाचू शकतात. त्यामुळे रक्तदान ही एक सामाजिक चळवळ व्हावी तसेच भविष्यात समाजात रक्तदान करण्यासाठी सर्व पत्रकार जनजागृती करून रक्तदानाविषयी चळवळ राबवली जाईल आणि तरुण युवकांनी ही रक्तदान चळवळ पुढे न्यावी तसेच रक्तदात्यांनी स्वतःहून पुढे येऊन स्वयंपुर्ती ने रक्तदान करावे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार मधुकर गलांडे यांनी केले.
इंदापूर शहरातील मुक्ताई ब्लड बँक या ठिकाणी इंदापूर सायकल क्लब व मुंबई वृत्तपत्र वृत्तवाहिनी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५१ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. या वेळी सायकल क्लबचे सुनिल मोहिते, नगरसेवक प्रशांत सिताफ, इंदापूर तालुका काॅग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष स्वप्निल सावंत, दशरथ भोंग यांनी मार्गदर्शन केले. शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने यंदा सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने घातली आहेत. त्या उद्देशाने इंदापूर सायकल क्लब व मुंबई वृत्तपत्र वृत्तवाहिनी यांनी मुक्ताई ब्लड बँकेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार सध्याच्या आपत्ती काळात रुग्णांना अत्यावश्यक असणाऱ्या रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तदान शिबिर राबविण्यात आले.
या वेळी इंदापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील सावंत, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके, सायकल क्लब चे अध्यक्ष सुनील मोहिते, मुंबई वृत्तवाहिनी संघाचे जिल्हाध्यक्ष महेश स्वामी, इंदापूर नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत शिताफ, मुक्ताई ब्लड बँकेचे संस्थापक अविनाश ननवरे, दशरथ भोंग, रमेश शिंदे, भगवान महाडिक, अनिल जाधव , महेबूब मोमीन, मिलिंद कैलगी संजय गारकवाड तसेच मुंबई वृत्तवाहिनी संघाचे विजय शिंदे ,जितेंद्र जाधव इम्तियाज मुलानी,सिद्धार्थ मखरे, निखिल कणसे, अशोक घोडके, नीलकंठ भोंग सह सर्व सदस्य पत्रकार तसेच मुक्ताई ब्लड बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात ज्या रक्तदात्यांनी वीस वेळापेक्षा जादावेळा रक्तदान केले आहे अशा रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला ७३ वेळा रक्तदान करणारे दत्तात्रेय जाधव यांचा विशेष सन्मान या वेळी करण्यात आला.