बारामतीतील म.ए.सो.चे कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालय बारामती प्रशालेत पालक सभा संपन्न
एकूण 430 पालक इयत्ता आठवी व नववी मुले व मुली या विभागांचे होते.

बारामतीतील म.ए.सो.चे कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालय बारामती प्रशालेत पालक सभा संपन्न
एकूण 430 पालक इयत्ता आठवी व नववी मुले व मुली या विभागांचे होते.
बारामती वार्तापत्र
पालक सभेस पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री आनंद मोरे तसेच सौ वनिता कदम शक्ती अभियान पथक डी वाय एस पी ऑफिस बारामती पथकाच्या प्रमुख व त्यांचे सहकारी उपस्थित होते सभा सरस्वती पूजन व स्तवनाने सुरू झाली सभेसाठी एकूण 430 पालक इयत्ता आठवी व नववी मुले व मुली या विभागांचे होते या सभेत सौ वनिता कदम यांनी मार्गदर्शन करताना वयात येणाऱ्या मुला मुलींच्या येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाय योजना यासंदर्भात मार्गदर्शन केले तसेच श्री आनंद मोरे यांनी या धावपळीच्या जगामध्ये आई-वडिलांनी जागृत राहून आपल्या पाल्याकडे लक्ष द्यावे व कमीत कमी मोबाईलचा वापर करावा व शाळेकडून चांगल्या पद्धतीने शिस्त राखण्यासाठी व व्यवस्थित अभ्यासक्रम शिकविण्याकडे लक्ष दिले जाते अशा प्रकारे उल्लेख केला. तसेच पालक शिक्षक संघाचे सचिव श्री अनिल गावडे सर यांनी शाळेच्या विविध उपक्रमाविषयी प्रस्तावनेत माहिती सांगितली.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ रोहिणी गायकवाड यांनी प्रशालेतील विविध विषयांच्या व इयत्तांच्या तासिका सुरू होतील व शाळेच्या भौतिक सुविधांच्या माध्यमातून सुशोभीकरण, स्टीम लॅब ,वर्ग खोल्यांचे नूतनीकरण करण्याचे काम चालू आहे तसेच शाळेमध्ये विविध भौतिक सुविधा, शिस्त, संस्कारक्षम शिक्षणासाठी पूरक विविध उपक्रम राबवून शिक्षक व पालक सुसंवादातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात.
श्री गिरीश कदम सर यांनी बदललेली परीक्षा पद्धती व निकाल यासंदर्भात माहिती सांगितली तसेच विशेष अभ्यासक्रमांतर्गत श्री वैभव शिंदे सर यांनी प्रशालेत दोन वर्षापासून सुरू झालेल्या फाउंडेशन कोर्स बाबत सविस्तर माहिती सांगितली अशा प्रकारे श्री सनतकुमार खोत यांनी सूत्रसंचालन केले व श्री शेखर जाधव सर यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले.
खेळीमेळीच्या वातावरणात पालक सभा संपन्न झाली.