बारामतीतील म ए सो च्या देशपांडे विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न
१९६७ व १९६८ च्या बॅचचा माजी विद्यार्थी

बारामतीतील म ए सो च्या देशपांडे विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न
१९६७ व १९६८ च्या बॅचचा माजी विद्यार्थी
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालयात १९६७ व १९६८ च्या बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला.
यासाठी वयाची ७५ वी गाठलेले माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाद्यांच्या गजरात माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करून औक्षण करण्यात आले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका रोहिणी गायकवाड यांनी अध्यक्षीय भाषणात प्रशालेच्या यशाचा आढावा घेऊन माजी विद्यार्थ्यांच्या मोलाच्या सहकार्याने प्रशालेची भौतिक सुधारणा होत असल्याचे प्रतिपादन केले.
आयुष्याच्या या वयात आपले जीवन आनंदी राहण्यासाठी अशी स्नेहसंमेलने पुन्हा पुन्हा घेण्याची आवश्यकता प्रकट करून राष्ट्राच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी सतत कार्य करीत असते आम्ही या प्रशालेचे माजी विद्यार्थी म्हणून शाळेच्या भौतिक विकासासाठी भरीव कृतज्ञता निधी जमा करून देण्याचे आश्वासन प्रकाश मोने सर यांनी दिले.
डॉ.वसंत ढमाळ व सदानंद करंदीकर यांनी शालेय जीवनातील शिक्षकांच्या अध्यापनाच्या विषयी आठवणी जागृत करून स्वरचित कविता गायनातून आपला आनंद प्रकट केला. याप्रसंगी मंचावर स्थानिक सल्लागार समिती सदस्य राजीवजी देशपांडे, समन्वयक पुरुषोत्तम कुलकर्णी, माजी नगराध्यक्षा मंगल सराफ,राष्ट्रपती पदक विजेते इसाक बागवान, प्रकाश मोने सर, डॉ. जयप्रकाश शहा, डॉ. सुधीर कोठारी, प्रतिष्ठित व्यावसायिक अजित शहा (वडूजकर), रवींद्र मुथा, मा मुख्याध्यापिका रोहिणी गायकवाड, पर्यवेक्षक शेखर जाधव उपस्थित होते.
यानिमित्ताने शाला समिती अध्यक्ष मा.अजय पुरोहित, महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, उपमुख्याध्यापक राजाराम गावडे, पर्यवेक्षक दिलीप पाटील, जयश्री शिंदे, यांनीही शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांचे स्वागत व परिचय मोहिनी देशपांडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवती झाडबुके यांनी केले तर मारुती नेवसे यांनी आभार मानले.