बारामतीतील वैभव चव्हाण झळकणार छोट्या पडद्यावर
ग्रामीण भागातील तरुणांना सुद्धा अभिनय क्षेत्रात मुख्य भूमिका मिळू शकते

बारामतीतील वैभव चव्हाण झळकणार छोट्या पडद्यावर
ग्रामीण भागातील तरुणांना सुद्धा अभिनय क्षेत्रात मुख्य भूमिका मिळू शकते
बारामती वार्तापत्र
ग्रामीण भागातील चेहयांनाही आता छोट्या पडद्यावर प्रमुख भूमिकांमध्ये स्थान मिळू लागले आहे.
बारामतीचा मराठमोळा कलाकार वैभव चव्हाण हा झी मराठीवर आगामी काळात येणा-या मन झालं बाजिंद या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.एक बारामतीकर झी मराठीवरील मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याने सध्या
बारामतीकरांसाठी हा कुतूहल व कौतुकाचा विषय ठरत आहे.
वैभव चव्हाण हा गेली अनेक वर्षे अभिनय क्षेत्रात काम करत आहे. काही दिवसांपूर्वी वैभव स्वराज्य जननी या मालिकेतदेखील प्रेक्षकांना दिसला होता.मुहम्मद तर्की हे पात्र साकारले होते. वैभव काही वर्षांपासून राज्यात छत्रपती संभाजी महाराजांवरील एकपात्री प्रयोग करीत आहे. बारामती शहरातील श्रीराम नगरचे रहिवासी असलेले बँक ऑफ महाराष्ट्र चे अधिकारी व जलतरण पट्टू अजित चव्हाण यांचा वैभव धाकटा मुलगा असून तो कृषी पदवीधर असून अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचे ठरविल्याने गेल्या 5 वर्षात पुणे मुंबई आदी ठिकाणी विविध संस्थांच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात काम करीत आहे.
ग्रामीण भागातील तरुणांना सुद्धा अभिनय क्षेत्रात मुख्य भूमिका मिळू शकते त्यासाठी सातत्य व प्रयत्न वादी असणे आवश्यक असल्याचे वैभव चव्हाण यांनी सांगितले.