बारामतीतील व्यापाऱ्यांचा सोमवारपासून दुकाने उघडण्याचा निर्णय
शनिवार व रविवार च्या कडकडीत बंदला पाठिंबा दिला आहे.

बारामतीतील व्यापाऱ्यांचा सोमवारपासून दुकाने उघडण्याचा निर्णय
शनिवार व रविवार च्या कडकडीत बंदला पाठिंबा दिला आहे.
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांच्या शिखर संस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, फॅम इत्यादी यांच्या सूचनेनुसार बारामती व्यापारी महासंघाच्या सर्व सदस्य संघटनांनी राज्य शासनाने पुकारलेल्या पुढील 2 दिवस शनिवार व रविवार च्या कडकडीत बंदला पाठिंबा दिला आहे. तथापि सोमवार दिनांक 12 एप्रिल 2021 पासून सर्व व्यापाऱ्यांनी आप आपली दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या कालावधीत उघडावीत.
सरकारने दिलेल्या कोव्हिडं 19 च्या सर्व नियमांचे पालन करावे.
आज यासंदर्भात बारामतीत बैठक झाली. यामध्ये सरकारने दिलेल्या कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करत सर्व व्यावसायिकांनी आपल्या कर्मचारी व ग्राहकांची योग्य ती सुरक्षेची काळजी घेत दुकाने उघडी ठेवावीत असा निर्णय घेण्यात आला.
सदर या बैठकीस अध्यक्ष नरेंद्र गुजराती, उद्योगपती सचिन सातव, सुशीलसेठ सोमाणी, स्वप्निल मुथा, प्रवीण गांधी, चेतन व्होरा, अभय गादीया, संजय सोमाणी, बाळू चांदगुडे, सुधीर वाडेकर, परेश वीरकर, नरेंद्र मोता, शैलेश साळुंखे, सुरेंद्र मुथा, फकृशेत भोरी, जगदीश पंजाबी, प्रवीण आहुजा, प्रमोद खटावकर, किरण गांधी व इतर अनेक व्यापारी उपस्थित होते.
सरकारने वाढत्या कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांचा आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसात लॉकडाऊन आणि इतर दिवशी त्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात घेतला होता. या निर्णयास राज्यभरातून व्यापाऱ्यांकडून विरोध होत असून, दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांसमवेत व्यवसायिकांनी बैठकही घेतली. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांचा अवधी देण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी दोन दिवसांच्या कडक लॉकडाऊन ला पाठिंबा दर्शवला. परंतु सोमवारपासून दुकाने उघडण्याचा निर्धार केला होता