सापडलेले पन्नास हजार प्रामाणिक पणाने मालकास परत
२१ व्या शतकाकडे जाताना आजही प्रामाणिक पणा टिकून

सापडलेले पन्नास हजार प्रामाणिक पणाने मालकास परत
२१ व्या शतकाकडे जाताना आजही प्रामाणिक पणा टिकून
बारामती वार्तापत्र
चारचाकी गाडी ची सर्व्हिसिंग करीत असताना गाडी च्या पुढील डिक्की च्या आत असलेले पन्नास हजार रुपये वर्कशॉप कर्मचारी यांना सापडल्यावर मूळ मालकास बोलावून सदर पन्नास हजार रुपये देऊन प्रामाणिक पणा आजही जोपासला जातो याचे उदाहरण घालून दिले आहे.
७ मार्च रोजी शरयु टोयोटा शो रूम मध्ये माळेगाव येथील मेडिकल व्यवसाईक रोहन भोसले यांची चारचाकी सर्व्हिसिंग करण्यासाठी चालक घेऊन गेले होते त्यावेळी शो रूम चे वर्कशॉप मधील कर्मचारी मनोज काळे व प्रतीक भोईटे यांना सदर पन्नास हजार ची रक्कम गाडीची डिक्की खोलल्यावर आत मध्ये सापडली त्यांनी वरिष्ठ अधिकारी यांना कल्पना दिल्यावर गाडीचे मालक रोहन भोसले यांना बोलावून सदर रक्कम सुपूर्द करण्यात आली या वेळी ग्राहक सेवा अधीकारी गणेश मोरे,सेवा अधिकारी मंगेश सोनवले,व अजित चव्हाण धनंजय नींबाळकर,प्रमेशवर उकरंडे आदी व विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्तीत होते वर्कशॉप कर्मचारी मनोज काळे व प्रतीक भोईटे यांचे कौतुक करण्यात आले .
२१ व्या शतकाकडे जाताना आजही प्रामाणिक पणा टिकून असल्याने पन्नास हजार परत मिळाल्याने समाधानी असल्याचे गाडीचे मालक रोहन भोसले यांनी सांगितले.
विक्री नंतर सेवा देताना ग्राहकांचा विश्वास जिकने महत्वाचे असल्याचे ग्राहक सेवा अधिकारी गणेश मोरे यांनी सांगितले