बारामतीतून संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूर कडे प्रस्थान.
" पंढरीच्या वाटेवर वारीचा हा अनुपम्य सुख सोहळा बारामती वार्तापत्र च्या कॅमेरात कैद"
बारामतीतून संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूर कडे प्रस्थान.
” पंढरीच्या वाटेवर वारीचा हा अनुपम्य सुख सोहळा बारामती वार्तापत्र च्या कॅमेरात कैद”
बारामती:-प्रतिनिधी
पालखी सोहळ्याच्या इतिहासात वारकऱ्यांच्या समवेत टाळ-मृदंगाच्या निनादात हरिनामाचा गजर करत श्री क्षेत्र देहू ते पंढरपूर असा निघणारा संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पायी पालखी सोहळा यंदा कोरोनाच्या संकटामुळे मात्र प्रथमच बस मधून पंढरीकडे प्रस्थान करत आहे.
फक्त आमच्या प्रेक्षकांसाठी हा एक्सक्लुझिव्ह क्लोज व्हिडिओ.
कोरोनाच्या साथीच्या रोगाचा परिणाम पहाता यंदाचा पारंपरिक पालखी सोहळा रद्द करण्यात आला असून शेकडो वर्षाची परंपरा लक्षात घेऊन मानाच्या ९ पालख्यांना बसमधून पंढरपूर येथे नेण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती मध्ये सायंकाळी ५ वाजता आगमन झाले मात्र वर्षानुवर्ष बारामतीमध्ये मुक्कामी असणारा पालखी सोहळा बारामतीकरांना अनुभवता आला नाही.
या बारामती मधील पालखीच्या प्रवासादरम्यान “पंढरीच्या वाटेवर वारीचा हा अनुपम्य सुख सोहळा पाहीन मी याची देही याची डोळा” प्रसंग बारामती वार्तापत्र च्या प्रतिनिधीने आपल्या कॅमेरात टिपला.