बारामतीत अमिताभ बच्चन, अजय देवगन यांची इंट्री
पिक्चर चा चित्रिकरणासाठी दोघेही एकत्र बारामतीत
बारामती वार्तापत्र
महानायक अमिताभ बच्चन आणि अजय देवगन आज सकाळी बारामतीत चित्रिकरणादरम्यान आले होते.मात्र याविषयी अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती.
आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हे दोघेही अभीनेते पिक्चरच्या एका सीन साठी बारामतीच्या विमानतळावर आले होते. एका हॅलिकॉप्टरमध्ये बसून दोघेही या विमानतळावर उतरणार आहेत अशा पद्धतीचे चित्रीकरण करायचे होते. त्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
मात्र हिंदी सिनेमा सृष्टीतील नावाजलेले दोन कलाकार बारामतीत आले हे समजल्यावर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र तोपर्यंत हे दोघेही नेते चित्रीकरण आटोपून मुंबईकडे रवाना झाले होते. दरम्यान अमिताभ बच्चन व अजय देवगण यांचे स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी, बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष रणजित पवार ,शुभांगी पवार यांनी केले .दरम्यान चाहत्याना या दोन बड्या अभिनेत्यांना पाहण्याची संधी मात्र हुकली.