बारामतीत अल्पवयीन मुलीची छेडछाड प्रकरणी एकावर गुन्हा.
अल्पवयीन मुलीची छेडछाड करत मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामतीत अल्पवयीन मुलीची छेडछाड प्रकरणी एकावर गुन्हा.
बारामती- प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीची छेडछाड करत मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राहुल रोहिदास जाधव( रा.शारदानगर, माळेगाव कॉलनी,ता.बारामती.जि पुणे) याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, दि.३ जुलै रोजी फिर्यादीच्या घराशेजारील असलेल्या इरिगेशनच्या गार्डनमध्ये सदर अल्पवयीन मुलगी गेली असता, फुले तोडत असताना आरोपी तेथे जात तू आता आठवीला आहेस, तुला सगळं कळतंय, तू माझ्या जवळ ये असे म्हणत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले व तिच्याजवळ येऊ लागला. तेव्हा ती घाबरून घरी निघून गेली. सदरचा प्रकार अल्पवयीन मुलीने तिच्या आईला सांगितला. फिर्यादीच्या आईने आरोपीच्या मामीला सदरचा प्रकार सांगून आरोपीस समजावून सांगण्यास सांगितले. परंतु दि. ४ रोजी फिर्यादी व तिची आई घरासमोर भांडी घासत असताना आरोपी तेथे येत सदरचा प्रकार माझ्या मामीला व मामाला का सांगितला असे म्हणत शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे. सदर घटनेचा तपास सहाय्यक फौजदार खाडे करीत आहेत.