स्थानिक

बारामतीत आंदोलकांना अटक व सुटका.

कार्यकर्त्यांसह इतर पाच जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

बारामतीत आंदोलकांना अटक व सुटका.

जमावबंदीचे आदेश असताना बेकायदा गर्दी जमवल्या प्रकरणी बारामतीतील महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह इतर पाच जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज भाजप, रासप, रिपाई, शिवसंग्राम आदी महायुतीच्या मित्रपक्षांनी दूध दरवाढीसाठी येथील प्रशासकीय भवन समोर दूध ओतून आंदोलन केले.आंदोलनावेळी सोशल डिस्टंन्स न पाळता कोरोना विषाणु संसर्ग पसरविण्याचा संभव असल्याचे व मानवी जिवीतास धोका निर्माण करणारे हयगईचे घातकी कृत्य केले आहे. अशी फिर्याद पोलीस नाईक पांडुरंग गोरवे यांनी दिली. त्यानुसार आंदोलक अँड.अमोल गुलाबराव सातकर (रा. जळोची,ता.बारामती), पांडुरंग मारुती कचरे (रा. काटेवाडी,ता.बारामती), सतीश अरुण फाळके, (रा. कसबा, बारामती), सुधाकर साहेबराव पांढरे,(रा. अशोकनगर, बारामती ),गोविंद ज्ञानदेव देवकाते (रा. विजयनगर, बारामती) व इतर अनोळखी ५ ते ६ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!