बारामतीत आज आणखी 21 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह,दिवसभरातील एकुण संख्या 45 वर.
बारामतीची रुग्ण संख्या 845 झाली आहे.
बारामतीत आज आणखी 21 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह,दिवसभरातील एकुण संख्या 45 वर.
बारामतीची रुग्ण संख्या 845 झाली आहे.
बारामती वार्तापत्र
सकाळी आलेल्या अहवालात पंचवीस जण कोरोना बाधित आढळून आल्यानंतर, संध्याकाळच्या अहवालात देखील 21 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
आज दिवसभरात 2 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज आखेर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या आता 35 वर पोहोचली आहे. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्यादेखील 845 वर पोहोचलेली आहे.
आज संध्याकाळी आढळलेल्या रुग्णांमध्ये भिमनगर बारामती येथील 49 वर्षीय पुरुष, सोमेश्वर नगर येथील 32 वर्षीय पुरुष, जळोची येथील 29 वर्षीय पुरुष, सुहासनगर येथील 35 वर्षीय पुरुष, कारभारीनगर येथील 43 वर्षे पुरुष रूग्णाचा समावेश आहे.
तपोवन कॉलनी येथील 65 वर्षीय पुरुष, वसुंधरा पार्क येथील 53 वर्षीय पुरुष, घाडगे वस्ती येथील पन्नास वर्षे पुरुष व 17 वर्षीय मुलगी, घाडगेवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, गुणवडी विठ्ठल मंदिरातील 52 वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे.
खांडज येथील 65 वर्षीय पुरुष, सुपे येथील 75 वर्षीय पुरुष, रुई येथील 22 वर्षीय महिला, रामनगर येथील 80 वर्षीय पुरुष, बारामती येथील 60 वर्षीय महिला, सिद्धार्थ सोसायटी येथील 25 वर्षीय महिला, मदनेवस्ती येथील 16 वर्षीय युवती व इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा यामध्ये समावेश आहे.