बारामतीत आज एकूण रुग्ण संख्या 33 ,,नागरिकांनो काळजी घ्या धोक्याची घंटा वाजली आहे
ग्रामीण भागात संख्या वाढतेय

बारामतीत आज एकूण रुग्ण संख्या 33 ,,नागरिकांनो काळजी घ्या धोक्याची घंटा वाजली आहे
ग्रामीण भागात संख्या वाढतेय
बारामती वार्तापत्र
बारामतीत आज कोरोना पॉझीटीव्ह रूग्णां ची एकूण रुग्ण संख्या 33 झाली आहे.शासकीय rt-pcr १७० नमुन्यामधून २० रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण २४ rt-pcr रुग्णांपैकी ०५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या २७. नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह ०८. रुग्ण आहे.
शहरातील14 तर ग्रामीण भागातील १९. रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.
बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या ६५९९ आहे तर बरे झालेले रुग्ण ६२५८ व एकूण मृत्यु १४५ इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .
बारामतीत काल शासकीय आरटीपीसीआर तपासण्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये कारंडे मळा येथील ३२ वर्षीय महिला, काटेवाडी येथील ३३ वर्षीय महिला, निरा येथील ५७ वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील ३२ वर्षीय पुरुष, जायपत्रे वाडी येथील १८ वर्षीय युवक, अशोक नगर येथील ३२ वर्षीय पुरुष, बारामती शहरातील ५३ वर्षीय महिला, उंडवडी येथील ते ३० वर्षीय पुरुष, साई गणेश नगर येथील ४९ वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील ७० वर्षीय महिला, निरावागज येथील ४२ वर्षीय पुरुष, माळेगाव येथील ३८ वर्षीय पुरुष, गुणवडी येथील २२ वर्षीय पुरुष, तांदुळवाडी येथील ४२ वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील तीस वर्षीय पुरुष, निरावागज येथील ४७ वर्षीय महिला, ८५ वर्षीय पुरुष, सावळ येथील ४१ वर्षीय पुरुष, गोजुबावी येथील ४५ वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील ३२ वर्षीय पुरुष, बाबुर्डी येथील ३५ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्त मध्ये माळेगाव खुर्द येथील ४९ वर्षीय महिला, सोनगाव येथील ५६ वर्षीय पुरुष, पिंपळी लिमटेक येथील ५० वर्षीय पुरुष, उंडवडी येथील ५० वर्षीय पुरुष, होळ आठ फाटा येथील ४२ वर्षीय पुरुष, विजय लक्ष्मी अपार्टमेंट साई गणेश नगर येथील ४९ वर्षीय पुरुष, सिद्धी अपार्टमेंट सायली हिल येथील २९ वर्षीय महिला कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
बारामतीतील पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅट तपासणीत पाहुणेवाडी येथील ७० वर्षीय पुरुष, रुई येथील विनायक अपार्टमेंट येथील ४७ वर्षीय पुरुष, विजयश्री बंगला विजयनगर येथील ५६ वर्षीय महिला, ६२ वर्षीय पुरुष, १४ महिन्याचा मुलगा, सायली हिल येथील ३८ वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा. अनावश्यक गर्दी टाळा