बारामतीत आज एकूण रुग्ण संख्या १४ शासकीय rt-pcr तपासणीही कमी झाल्याने रुग्ण संख्या कमी आहे
थांबलेला कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय रुग्णांची वाढती संख्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. ग्रामीण भागात रुग्ण संख्या कमी आहे मात्र मागील दोन महिन्यातील संख्या व आत्ताच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे मात्र शहरातील संख्या वाढलेलीच
बारामतीत आज एकूण रुग्ण संख्या १४ शासकीय rt-pcr तपासणीही कमी झाल्याने रुग्ण संख्या कमी आहे
थांबलेला कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय रुग्णांची वाढती संख्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
ग्रामीण भागात रुग्ण संख्या कमी आहे मात्र मागील दोन महिन्यातील संख्या व आत्ताच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे मात्र शहरातील संख्या वाढलेलीच
बारामती वार्तापत्र
बारामतीत आज कोरोना पॉझीटीव्ह रूग्णां ची एकूण रुग्ण संख्या १४ झाली आहे.
शासकीय rt-pcr १२ नमुन्यामधून 1 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण २८ rt-pcr रुग्णांपैकी १२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या १३ नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह ०१.रुग्ण आहे.
शहरातील ११ तर ग्रामीण भागातील ०३ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.
बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या ६५६६ आहे तर बरे झालेले रुग्ण ६२३५ व एकूण मृत्यु १४५ इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .
बारामतीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये ४३ वर्षे डॉक्टर ४१ वर्षीय डॉक्टर पत्नी व अकरा वर्षीय मुलास कोरोनाची बाधा झाली आहे. या डॉक्टरांनी कोरोनाच्या काळामध्ये त्यांचे हॉस्पिटल कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी डेडीकेटेड केले होते. याखेरीज काल बारामतीत सरकारी आरटीपीसीआर तपासणी बंद होती. मात्र खाजगी शाळांमधील तपासणीत पंधरा जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अमराई येथील ३२ वर्षीय महिला, ७३ वर्षीय महिला, मुक्ती व्हिलेज शेजारील ५३ वर्षीय महिला, दूध संघ सोसायटी शेजारील ५२ वर्षीय पुरुष, विद्या हाऊसिंग सोसायटी शेजारील २४ वर्षीय महिला, बारामती शहरातील ३३ वर्षीय पुरुष, जळोची येथील ७० वर्षीय महिला व शहरातील ३२ वर्षीय पुरुष रुग्णास कोरोनाची बाधा झाली आहे
तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा.अनावश्यक गर्दी टाळा