बारामतीत आज कोरोणाची रुग्णसंख्या कालच्या तुलनेत वाढली.
एकुण 26 रुग्ण पॉझीटीव्ह
बारामती वार्तापत्र
बारामतीत कालच्या तुलनेत आज रुग्ण संख्या वाढून 26 झाली आहे.
शासकीय rt-pcr 127 नमुन्यांमधुन 14 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 21 नमुन्यांपैकी 4 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर एंटीजन तपासणीमध्ये 34 नमुन्यांमधून 8 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे बारामतीची एकूण रुग्ण संख्या 26 झाली आहे.तर तालुक्याचे बाहेरील 2 रुग्ण पॉझीटीव्ह आढळून आले.
बारामतीत कालच्या आठ दिवसाच्या तुलनेत ग्रामीण ची रुग्ण संख्या जास्त होती. मात्र आज झालेल्या तपासणीत शहरातील रुग्णसंख्या वाढली आहे.
शहरात एकूण 15 रुग्ण तर ग्रामीण भागात एकूण 11 रुग्ण सापडले आहेत.
त्यामुळे तालुक्यातील आजपर्यंतची एकूण रुग्ण संख्या 5736 व बरे झालेले रुग्णांची संख्या 5416 तर एकूण मृत्यू 136 असे आहेत.
तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा काळजी घ्या, घाबरू नका तोंडाला मास्क लावा ,सॅनिटायझरचा वापर करा, अनावश्यक गर्दी टाळा