बारामतीत आज कोरोनाचे ६० रुग्ण पॉझिटिव्ह
आजपर्यंत एकुण ७४०५ कोरोना बाधीत.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात ३८ आणि बारामती ग्रामीण मध्ये २२ रुग्णसंख्या झालेली आहे.
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये २२९ नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह २६ रुग्ण आहेत
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr ४९ नमुन्यांपैकी २३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या ३३ नमुन्यांपैकी एकूण ११ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामतीत काल झालेल्या विविध शासकीय प्रयोगशाळेत आरटीपीसीआर तपासण्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये गोजुबावी येथील २५ वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील १३ वर्षीय मुलगी, १५ वर्षीय मुलगा, इंदापूर रोड येथील ३६ वर्षीय पुरुष, विद्यानगरी येथील ३५ वर्षीय पुरुष, कांबळेश्वर येथील २५ वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील ६२ वर्षीय पुरुष, ४१ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय महिला, १५ वर्षीय मुलगा, ३९ वर्षीय महिला, पणदरे येथील ३३ वर्षीय महिला, म्हसोबावाडी येथील ५२ वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील १९ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला, ५२ वर्षीय पुरुष, नक्षत्र गार्डन येथील ४७ वर्षीय पुरुष, माळेगाव येथील ३८ वर्षीय पुरुष, कसबा येथील १५ वर्षीय मुलगा, तांदूळवाडी येथील ४८ वर्षीय महिला, खत्री इस्टेट येथील १७ वर्षीय मुलगा, माळवाडी येथील ४० वर्षीय पुरुष, कॉसमॉस बँकेचे शेजारी ५३ वर्षीय महिला, हरिकृपानगर येथील ३२ वर्षीय पुरुष, पाणी योजना विभागाचे शेजारी २३ वर्षीय पुरुष, मोरगाव येथील ४१ वर्षीय पुरुष, अंबुरे वस्ती तांदुळवाडी येथील २६ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील रुई येथे काल तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सूर्यनगरी येथील श्री ४० वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आला आहे
बारामतीत काल खाजगी प्रयोगशाळेत मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये माळेगाव येथील ६७ वर्षीय पुरुष, अशोक नगर येथील मंगल बंगला येथील ५२ वर्षीय महिला, आनंदनगर भिगवण
रोड येथील ७२ वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ६० झाली आहे
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ७४०५ तर एकूण बरे झालेले रुग्ण ६६९३ एकूण मृत्यू १४७.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.