कोरोंना विशेष

बारामतीत आज कोरोनाने ओलांडली सत्तरी,, आज ७२ रुग्ण पॉझिटिव्ह

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ७५४५

बारामतीत आज कोरोनाने ओलांडली सत्तरी,, आज ७२ रुग्ण पॉझिटिव्ह

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ७५४५

बारामती वार्तापत्र

बारामती शहरात ५५ आणि बारामती ग्रामीण मध्ये १७ रुग्णसंख्या झालेली आहे.

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये ३१९ नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह ४७ रुग्ण आहेत
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr ३८ नमुन्यांपैकी १२ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या ३६ नमुन्यांपैकी एकूण १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

काल बारामतीत झालेल्या विविध तपासण्यांमध्ये तब्बल ७० जण कोरोनाबाधित आढळले आहेत. मागील तेरा दिवसांत जेवढे रुग्ण आढळले, तेवढे मागील चार महिन्यात आढळले नव्हते, त्यावरून कोरोनाचा बारामतीतील कहर किती आहे याची कल्पना येईल. मात्र तरीदेखील रस्त्याकडेचे स्टॉल, हॉटेल्स, कार्यालये, दुकाने गर्दीने भरलेली आहेत. त्यातूनच व्यावसायिकांमध्ये कोरोनाचे प्रमाण अधिक आढळू लागले आहे. बारामतीत सायलंट कॅरिअर अधिक संख्येने फिरत आहेत हेही यातून दिसत आहे.

बारामतीत काल झालेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तामध्ये पणदरे येथील २४ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय पुरूष, संघवीनगर येथील ५४ वर्षीय महिला, बारामती शहरातील ३२ वर्षीय महिला, ७५ वर्षीय महिला, २५ वर्षीय पुरूष, १६ वर्षीय युवक, काऱ्हाटी येथील १३ वर्षीय मुलगी, ३४ वर्षीय महिला, देऊळगाव रसाळ येथील ५५ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

सोनगाव येथील ३० वर्षीय पुरूष, पणदरे येथील ४५ वर्षीय महिला, लकडेवाडी येथील ३५ वर्षीय पुरूष, बारामती येथील ५१ वर्षीय पुरूष, २६ वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय पुरूष, कसबा येथील २६ वर्षीय पुरूष,देसाई इस्टेट येथील ३८ वर्षीय पुरूष, २१ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.बारामती शहरातील ६८ वर्षीय महिला, ५५ वर्षीय पुरूष, ३७ वर्षीय महिला, १८ वर्षीय महिला, ६८ वर्षीय पुरूष, ३० वर्षीय पुरूष, १९ वर्षीय युवक, ११ वर्षीय मुलगा, ३३ वर्षीय पुरूष, ३१ वर्षीय पुरूष, ४८ वर्षीय पुरूष, ३१ वर्षीय पुरूष, तांदूळवाडी येथील ४५ वर्षीय पुरूष, माळेगाव येथील ३० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.

रुई येथील ३८ वर्षीय महिला, ग्रीन पार्क येथील ३९ वर्षीय पुरूष, काटेवाडी येथील ५६ वर्षीय पुरूष, बारामतीतील २१ वर्षीय पुरूष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील ५८ वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील ३० वर्षीय पुरूष, बारामती शहरातील ४३ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

तांबेनगर येथील ५० वर्षीय पुरूष, विद्या प्रतिष्ठानच्या कर्मचाऱ्यांमधील २० वर्षीय महिला, तांबेनगर येथील ३३ वर्षीय पुरूष, जळोची येथील २० वर्षीय पुरूष, मुढाळे येथील ३५ वर्षीय पुरूष, पणदरे येथील ३१ वर्षीय महिला, एमआयडीसी येथील २३ वर्षीय पुरूष, कऱ्हावागज येथील ३८ वर्षीय पुरूष, ३८ वर्षीय पुरूष, निरावागज येथील २० वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

बारामतीतील मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या विविध नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पणदरे येथील ६५ वर्षीय पुरूष, शारदानगर येथील ५६ वर्षीय पुरूष, सत्यसाईनगर येथील ३२ वर्षीय पुरूष, ३७ वर्षीय महिला, निरावागज येथील ५६ वर्षीय महिला, सावळ येथील ५५ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.

मार्केट यार्ड देशपांडे इस्टेट येथील ५० वर्षीय महिला, ५६ वर्षीय पुरूष, दुर्गा चित्रमंदिराशेजारी २० वर्षीय महिला, ग्रीन पार्क एमआयडीसी येथील ३१ वर्षीय महिला, श्रीराम मंगल कार्यालय गुनवडी रोड येथील ३९ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

विश्व एम्पायर भिगवण रोड येथील ४१ वर्षीय पुरूष,फुलचंद हाऊस कॅनाल रोड येथील ७३ वर्षीय पुरूष, ६३ वर्षीय पुरूष, समर्थनगर गुनवडी रोड येथील ५० वर्षीय पुरूष, संघवी पार्क इंदापूर रोड येथील २ वर्षीय महिलेचा यामध्ये समावेश आहे.

त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ७२ झाली आहे.

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ७५४५ तर एकूण बरे झालेले रुग्ण ६७७८ एकूण मृत्यू १४८.

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!