
बारामतीत आज कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांनी केली चाळीशी पार
शहरातील रुग्ण संख्या वाढलेलीच
बारामती वार्तापत्र
बारामतीत आज ४१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
बारामती शहरात 22 आणि बारामती ग्रामीण मध्ये १९ रुग्णसंख्या झालेली आहे.
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये १८९ नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह २८ रुग्ण आहेत
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr ३१ नमुन्यांपैकी ७ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या १४ नमुन्यांपैकी एकूण ६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ४१ झाली आहे.
बारामतीत काल झालेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये कोऱ्हाळे बुद्रुक येथील ३७ वर्षीय महिला, ६५ वर्षीय महिला, १७ वर्षीय मुलगा, तांबेनगर येथील ३४ वर्षीय महिला, पणदरे येथील ६० वर्षीय पुरुष, २१ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय पुरुष, सांगवी येथील ४६ वर्षीय पुरुष, रामगल्ली येथील २७ वर्षीय महिला, पारवडी येथील १३ वर्षीय मुलगी, ४ वर्षीय मुलगी, मानाजीनगर येथील ५३ वर्षीय महिला, शिरवली येथील १३ वर्षीय मुलगा, १९ वर्षीय महिला, ९ वर्षीय मुलगा, काळेनगर येथील ६४ वर्षीय महिला, ३३ वर्षीय महिला, खत्री इस्टेट येथील ३० वर्षीय महिला, सुपा येथील ५१ वर्षीय पुरुष, तांबे नगर येथील ७३ वर्षीय महिला, वसंतनगर येथील ४७ वर्षीय पुरुष, कसबा येथील २१ वर्षीय पुरुष, शिवनगर येथील ३९ वर्षीय पुरुष, शिवाजी चौक येथील 33 वर्षीय महिला, विवेकानंदनगर येथील ७३ वर्षीय पुरुष, पणदरे येथील १८ वर्षीय युवक, कोऱ्हाळे बुद्रुक येथील ३८ वर्षीय पुरुष, जळोची येथील ४० वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये करावागज माळी आळी येथील ६२ वर्षीय पुरुष, माळेगाव कॉलनी शारदा नगर येथील ३० वर्षीय, ३० वर्षीय पुरुष, पणदरे भैरवनाथ मंदिर शेजारी ४५ वर्षीय पुरुष, सराफ रोडलाईन नेवसे रोड बुरुड गल्ली येथील ५८ वर्षीय पुरुष, पार्थ अव्हेन्यू कसबा येथील ४७ वर्षीय महिला, कारभारी नगर कसबा येथील ६५ वर्षीय पुरुष, जयश्री गार्डन शेजारी सम्राट अपार्टमेंट येथील ६५ वर्षीय महिला, आदर्श नगर येथील ४६ वर्षीय पुरुष, वैष्णव कुंज अपार्टमेंट विजय नगर येथील ३९ वर्षीय महिला, पितृछाया बंगला अशोक नगर येथील ४८ वर्षीय महिला, स्वप्न कुंज अपार्टमेंट सूर्यनगरी येथील ५६ वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ६८९४ तर एकूण बरे झालेले रुग्ण ६४०३ एकूण मृत्यू १४६.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.