बारामतीतील देशपांडे विद्यालय केंद्रात शांत आणि सुरळीत दहावी बोर्ड परीक्षा सुरू
३७४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट असून एकूण सोळा परीक्षा खोल्यात बसण्याची व्यवस्था

बारामतीतील देशपांडे विद्यालय केंद्रात शांत आणि सुरळीत दहावी बोर्ड परीक्षा सुरू
३७४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट असून एकूण सोळा परीक्षा खोल्यात बसण्याची व्यवस्था
बारामती वार्तापत्र
२१ फेब्रुवारी: येथील प्रतिष्ठित मएसोचे कै. ग. भि. देशपांडे विद्यालय परीक्षा केंद्रात दहावी बोर्ड परीक्षेला अत्यंत शांततापूर्ण आणि सुरळीत सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना निर्विघ्न वातावरण मिळावे यासाठी शाळा प्रशासन, परीक्षा अधिकाऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत.
पहिल्या दिवशी विद्यार्थी आत्मविश्वासाने पेपरला सामोरे जावे म्हणून केंद्राच्या वतीने केंद्र संचालिका व प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी बारामती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी साहेब यांनी परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या . प्रशालेचे उपमुख्याध्यापक राजाराम गावडे , पर्यवेक्षक शेखर जाधव, दिलीप पाटील , पर्यवेक्षिका जयश्री शिंदे, प्रशालेतील शिक्षक , पालक वृंद आदी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते .परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. या केंद्राची ओळख कॉपीमुक्त केंद्र म्हणून आहे , त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कॉपी व गैरप्रकार न करण्याची प्रतिज्ञा म्हणून घेण्यात आली . गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्रात बैठे पथक , भरारी पथक तयार करण्यात आली आहेत.
विद्यालयाच्या मुख्याध्यापका सौ. रोहिणी गायकवाड यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी योग्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले आहेत.
शांत, सुरक्षित आणि अनुशासित वातावरणात परीक्षा पार पडेल याची आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत. या केंद्रात ३७४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट असून एकूण सोळा परीक्षा खोल्यात बसण्याची व्यवस्था केली आहे .
परीक्षेला उपस्थित राहिलेले विद्यार्थी आणि पालक केंद्राच्या व्यवस्थेवर समाधानी असल्याचे दिसून आले.
संस्थेच्या वतीने नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, शाळा समिती अध्यक्ष अजय पुरोहित, विद्यालयाचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, सल्लागार समिती सदस्य राजीवजी देशपांडे , समन्वयक पुरुषोत्तम कुलकर्णी यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या .