बारामतीत आज पर्यंत एकूण १३२ कोरोना रुग्ण संख्या.
तर एकूण १३ जणांचा मृत्यू.
बारामती:वार्तापत्र
आज शनिवार 1 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजे पर्यंत कोरोना विषयी सविस्तर माहिती खालील प्रमाणे ….
काल (शुक्रवार 31 जुलै) बारामती मध्ये एकूण 34 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 25 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी 24 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून काल संध्याकाळी बारामती हॉस्पिटल मध्ये मारवाड पेठेतील 76 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता तिचा अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाला असून तो पॉझिटिव आलेला आहे व उर्वरित 9 जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे बारामतीतील एकूण रुग्ण संख्या संख्या 132 झालेली आहे व त्यापैकी उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 68 असून 48 रुग्ण वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत व 3 जण घरी उपचार घेत आहेत असे एकूण 51 रुग्ण उपचारा खाली आहेत व एकूण 13 जणांचा मृत्यू झालेला आहे.
बारामतीकरांना प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते की आपण गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे , मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा व सोशल डिस्टंसिंग पाळावे व कोरोना पासून बचाव करावा व कोरोना सदृश्य लक्षणे असल्यास,(विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी) तात्काळ सरकारी दवाखान्याशी संपर्क साधावा असे आव्हान प्रशासनाने केले आहे