बारामतीत आज पुन्हा 59 जणांचे स्वॅब घेण्यात आले.
कालचे 61 जणांचे अहवाल निगेटिव्ह.
बारामती :वार्तापत्र
बारामती शहरात आज सकाळी एक आणि सायंकाळी एक असे दोन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर ६१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची अशी माहिती तालुका अधिकारी यांनी दिली त्याचा हा व्हिडिओ .????????
दरम्यान, आज एकूण ५९ जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून त्यांचे अहवाल आज रात्री किंवा उद्या सकाळी हाती येणार आहेत.
बारामती शहरात मागील आठवड्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजना राबवण्यास सुरुवात झाली आहे. काल कोरोनाबाधितांच्या संपर्कातील ६३ जणांची तपासणी करण्यात आली होती.
त्यातील ६१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सकाळी शहरातील जिल्हा क्रीडा संकुल वसतिगृह युवकाला आणि सायंकाळी पाटस रस्त्यावरील महादेव मळा येथील रुग्णाच्या भावाला अशा एकूण दोनजणांना कोरोनाची लागण झाली आहे.
दरम्यान, आज दिवसभरात ५९ जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून त्यांचे अहवाल आज रात्री किंवा उद्या सकाळी हाती येतील अशी माहितीही डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. दुसरीकडे बारामती शहरात उद्यापासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तीन टप्प्यात हा लॉकडाऊन राबवण्यात येणार असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी या उपाययोजना राबवण्यात येत आहेत.