कोरोंना विशेष

बारामतीत आज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 18 वर पोहोचली

शहरापेक्षा ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढलेलीच

बारामतीत आज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 18 वर पोहोचली

शहरापेक्षा ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढलेलीच

बारामती वार्तापत्र
बारामतीत आज कोरोना ची एकूण रुग्ण संख्या 18 झाली आहे.

शासकीय rt-pcr 124नमुन्यामधून 10 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण 14 rt-pcr रुग्णांपैकी 2 रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या 19 नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह 6 रुग्ण आहेत.
शहरातील 8 तर ग्रामीण भागातील 10रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात 2 ने रुग्णसंख्या जास्त आहे.

बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 6223आहे तर बरे झालेले रुग्ण 5957 व एकूण मृत्यु 143 इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .

बारामतीत झालेल्या विविध तपासण्यांमध्ये शिरवली येथील 46 वर्षीय पुरुष, मेडद येथील 41 वर्षीय महिला, पिंपळी येथील 70 वर्षीय महिला, चोपडज येथील 44 वर्षीय पुरुष, उत्कर्ष नगर येथील 58 वर्षीय महिला, गुणवडी रोड देवळे पार्क येथील तीस वर्षीय महिला, दत्त बेकरी नजीक 67 वर्षीय महिला, वडगाव निंबाळकर येथील 76 वर्षीय पुरुष, माळेगाव येथील 47 वर्षीय महिला, झारगडवाडी येथील 47 वर्षीय पुरुष कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.

बारामती तालुक्यात काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये टीसी कॉलेज नजीक 70 वर्षीय पुरुष, अशोक नगर येथील 47 वर्षीय पुरुष, सोनगाव येथील 48 वर्षे पुरुष, अष्टयात्तर वर्षीय पुरुष कोरोनाग्रस्त आढळून आले असून पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅट तपासणीत अशोकनगर येथील 40 वर्षीय पुरुष बांधकाम व्यवसायिक कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.

तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा.अनावश्यक गर्दी टाळा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!