बारामतीत आज ७ कोरोना पॉझिटिव्ह.
टीसी कॉलेज जवळील एक रुग्ण पाटस रोड येथील एक रुग्ण व फलटण रोड येथील रुग्ण असे शहरातील तीन व राजबाग काळखैरेवाडी येथील एक रुग्ण का-हाटी येथील एक रुग्ण व सावळ येथील एक रुग्ण व बारामती हाॅस्पिटल येथे काम करणारा गुणवडी .
बारामतीत आज ७ कोरोना पॉझिटिव्ह.
काळजी घेण्याचे प्रशासन चे आवाहन.
बारामती:वार्तापत्र
बारामतीतील 34 जणांच्या नमुन्यांपैकी नऊ जणांचा अहवाल प्रतीक्षेत होता, त्यापैकी सात जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसात पहिल्यांदाच पुन्हा एकदा बारामती मध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे.
पॉझिटिव्ह आढळून आलेले मध्ये टीसी कॉलेज जवळील एक रुग्ण पाटस रोड येथील एक रुग्ण व फलटण रोड येथील रुग्ण असे शहरातील तीन व राजबाग काळखैरेवाडी येथील एक रुग्ण का-हाटी येथील एक रुग्ण व सावळ येथील एक रुग्ण व बारामती हाॅस्पिटल येथे काम करणारा गुणवडी येथील एक कर्मचारी असे एकूण सात रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत.
काल बारामती मध्ये एकूण 34 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 25 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी 24 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. उर्वरित 9 जणांचा अहवाल प्रतीक्षेत होता.
आता बारामतीतील एकूण रुग्ण संख्या संख्या 139 झालेली आहे व त्यापैकी उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 68 असून 58 रुग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालेला आहे.
बारामतीकरांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे , मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा व सोशल डिस्टंसिंग पाळावे व कोरोना पासून बचाव करावा व कोरोना सदृश्य लक्षणे असतील तर विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी तात्काळ सरकारी दवाखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी केले आहे