बारामतीमध्ये काल 28 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 5277 वर गेली आहे.

बारामतीमध्ये काल 28 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 5277 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (07/12/20) एकूण rt-pcr नमुने 236. एकूण पॉझिटिव्ह-13 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -10 त्यापैकी पॉझिटिव्ह -03. कालचे एकूण एंटीजन 65. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-12. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 13+03+12=28. शहर-18 . ग्रामीण- 10. एकूण रूग्णसंख्या-5277 एकूण बरे झालेले रुग्ण- 4697 एकूण मृत्यू– 132.
काल बारामती तालुक्यात शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सुमन विहार येथील 20 वर्षीय महिला, तांबेनगर येथील 35 वर्षीय पुरुष, साईनगर येथील 35 वर्षीय महिला, सस्तेवाडी येथील 44 वर्षीय पुरुष, नेपतवळण येथील 36 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, दहा वर्षीय मुलगी, 65 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, फिरकीचा बोळ येथील 18 वर्षीय महिला, ढेकळवाडी येथील 14 वर्षीय मुलगी, थोपटेवाडी येथील 66 वर्षीय महिला, काटेवाडी येथील 53 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली आहेत.
बारामतीत शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बारामती शहरातील 38 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय महिला, साई गणेश नगर येथील 67 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 28 वर्षीय पुरुष, जळोची येथील 36 वर्षीय महिला, रुई येथील 41 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 56 वर्षीय पुरुष, संभाजीनगर येथील 42 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.