बारामतीत उच्च तंत्रज्ञानावर आधारित भाजीपाला शेतीची ऑनलाइन कार्यशाळा संपन्न
देशातील 72 कृषी विज्ञान केंद्राचा सहभाग
बारामतीत उच्च तंत्रज्ञानावर आधारित भाजीपाला शेतीची ऑनलाइन कार्यशाळा संपन्न
देशातील 72 कृषी विज्ञान केंद्राचा सहभाग
बारामती वार्तापत्र
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती, व भाजीपाला गुणवत्ता केंद्र (इंडो-डच प्रकल्प) आणि आटारी, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन कार्यशाळा “ उच्च तंत्रज्ञानावर आधारित भाजीपाला शेती व भाजीपाला कलम तंत्रज्ञान” या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातील ४० के.व्ही.के., गुजरातमधील ३० के.व्ही.के., गोवा राज्यातील २ के.व्ही.के. अशी एकूण ७२ के.व्ही.के. व त्या कृषी विज्ञान केंद्रामधील वरिष्ठ शास्त्रज्ञ व विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) सहभागी झाले होते.
या प्रशिक्षणाची सुरुवात मा. डॉ. लाखनसिंग, संचालक, आटारी झोन-VIII पुणे यांच्या मार्गदर्शनाने झाली. अशा प्रकारची वर्ग के.व्ही.के. तज्ञ व शेतकर्यांनी भाजीपाला गुणवत्ता केंद्र, बारामती येथे करावी असे आवाहन केले. प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, के.व्ही.के. बारामतीचे चेअरमन श्री. राजेंद्र पवार यांचे आभार मानले. सद्यपरीस्थिती बघता महाराष्ट्रामध्ये नेदरलँड तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे त्यामध्ये प्रामुख्याने संरक्षित शेती तंत्रज्ञान महत्वाचे आहे.
प्रथम सत्रामध्ये हॉलंडडोअर नेदरलँड कंपनीचे संचालक श्री. निक बोडन यांनी नेदरलँडमधील उच्च तंत्रज्ञानावर आधारित भाजीपाला शेती व भारतातील शेती यामधील फरक व अवगत करावयाचे तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले कि, नेदरलँडमधील ९० % भाजीपाला निर्यात केला जातो यामध्ये प्रामुख्याने ग्रीनहाउस वातावरण नियंत्रण, स्वयंचलित खत व पाणी व्यवस्थापन यंत्रणा व पिकांचे काढणीपश्चात व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. महत्वाचा मुद्दा म्हणजे यांच्या म्हणण्यानुसार नेदरलँड तंत्रज्ञान आहे असे कॉपी करता येत नाही यामध्ये बदल करून वापरणे गरजचे आहे.
व्दितीय सत्रामध्ये श्री. यशवंत जगदाळे, विषय विशेषज्ञ- उद्यानविद्या, के.व्ही.के. बारामती यांनी भाजीपाला गुणवत्ता केंद्रामध्ये मागील तीन वर्षापासून चाललेले प्रयोग व संशोधन याविषयी माहिती दिली यामध्ये प्रामुख्याने माती विना शेती, कलमी भाजीपाला रोपे उत्पादन, संरक्षित शेतीचे प्रकार, आधुनिक व नेदरलँडच्या धरती वर पाणी व खत व्यवस्थापन व विषमुक्त भाजीपाला उत्पादन व निर्यात याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
शेवटच्या सत्रामध्ये श्री. तुषार जाधव प्रकल्प सहयोगी, भाजीपाला गुणवत्ता केंद्र, बारामती यांनी रोपे निर्मिती साठी कलम तंत्रज्ञान व उच्च तंत्रज्ञानावर आधारित भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन याविषयी माहिती दिली.
प्रशिक्षणाच्या शेवटी डॉ. आर.एस.जाधव प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, बारामती सर्व सहभागी प्रशिक्षणार्थी श्री. निक बोडन नेदरलँड व डॉ. लाखनसिंग, संचालक आटारी यांचे आभार मानले.